Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

सरकारने शेतकर्‍यांच्या मदतीसाठी लॉन्च केली ‘ही’ नवीन सुविधा सुरू केली, जाणून घ्या फायदे

0 13

MHLive24 टीम, 17 जुलै 2021 :- शेतकर्‍यांच्या मदतीसाठी भारत सरकारने किसान सारथी हा एक खास डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. याच्या मदतीने शेतकरी बांधवांना योग्य वेळी योग्य माहिती मिळू शकेल. याचा मोठा फायदा म्हणजे त्यांच्या स्वत: च्या भाषेत ही माहिती मिळेल.

कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एकत्रितपणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किसान सारथीला लॉन्च केले. किसान सारथी आयसीएआरच्या 93 व्या स्थापना दिनानिमित्त लाँच करण्यात आली आहे.

Advertisement

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मत्स्यपालन, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला, कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी तसेच कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे होते.

माहिती तंत्रज्ञान मंत्री वैष्णव यांनी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय व इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने किसान सारथीला दुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तांत्रिक हस्तक्षेप करून सक्षम बनविण्याच्या या उपक्रमाचे अभिनंदन केले.

Advertisement

ते म्हणाले की डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून कृषी व संबंधित क्षेत्राबाबत कृषी विज्ञान केंद्राच्या (केव्हीके) संबंधित वैज्ञानिकांचा वैयक्तिक सल्ला थेट शेतकऱ्यांना मिळू शकेल.

वैष्णव यांनी आयसीएआरच्या वैज्ञानिकांना शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या दारातूनच आपला शेतमाल, गोदामे, ज्या ठिकाणी कमीतकमी तोट्याने विक्री करायची आहे अशा ठिकाणी नेण्यासाठी तांत्रिक हस्तक्षेप करण्यास सांगितले. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांनी आश्वासन दिले की इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, संप्रेषण मंत्रालय, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, मत्स्यपालन, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्रालय शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक मदत करण्यास सदैव तत्पर राहील.

Advertisement

रेल्वे मंत्रालय पिकांच्या वाहतुकीसाठी लागणार वेळ आणखी कमी करण्याचा विचार करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या 93 व्या स्थापना दिनानिमित्त अभिनंदन करताना वैष्णव म्हणाले की, माननीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या सक्षम नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली किसान सारथी उपक्रमाने केवळ विशिष्ट माहिती गरजा भागविण्यासच मदत केली नाही तर शेतकर्‍यांचे, शेतीचा देखील विस्तार करण्यात खूप मोलाची मदत केली आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement