Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

अधिवेशन दोन दिवसांचेच

0 0

MHLive24 टीम, 23 जून 2021 :- गेल्या सव्वा वर्षांपासून विधिमंडळाचे पूर्ण काळ अधिवेशन होऊ शकलेले नाही. आताही अधिवेशन पूर्ण वेळ घेण्याची मागणी होत होती; परंतु अधिवेशन दोनच दिवसांचे होणार आहे.

पाच व सहा जुलैला अधिवेशन :- विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली असून ५ आणि ६ जुलै रोजी होणाऱ्या अधिवेशनातून प्रश्नोत्तराचा तास, तारांकित प्रश्न, लक्षवेधी वगळण्यात आली आहे.

Advertisement

राज्यातील प्रलंबित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पावसाळी अधिवेशन किमान १५ दिवसांचे घेण्यात यावे, अशी मागणी भाजपने केली होती. तसेच दोनच दिवसांच्याी अधिवेशनाच्या, निर्णयावर जोरदार टीका केली आहे.

विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक :- कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना विरोधकांकडून मराठा आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र अधिवेशन घेण्याची मागणी केली होती.

Advertisement

तसेच पावसाळी अधिवेशन १५ दिवसांचे घेण्यात यावे, अशीही मागणी केली होती. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली.

भाजपचा बहिष्कार :- या बैठकीत ५ आणि ६ जुलै रोजी दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांचे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे भाजपाने बैठकीवर बहिष्कार टाकत सभात्याग केला. विरोधकांनी सरकारच्या अधिवेशन घेण्याच्या निर्णयावर टीका केली आहे.

Advertisement

‘कोरोनाचा आजार गंभीर आहे. त्याबद्दल सर्व प्रकारची काळजी घेतली पाहिजे. आम्हीही सरकारला मदत करतोय; पण कोरोनाचा बहाणा करून अधिवेशन घ्यायचं नाही, असा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement