Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

सात दिवस बँक राहणार बंद : लॉकडाऊन काळात होणारा खोळंबा टाळण्यासाठी सुट्टया पाहून नियोजन करा

0

आरबीआयच्या वेबसाइटनुसार मे मध्ये एकूण 12 दिवस बँका बंद असणार आहेत. यामध्ये आठवड्याच्या सुट्ट्या देखील समाविष्ट आहेत. यापैकी काही सुट्ट्या झाल्या आहेत, तर अद्यापही सात सुट्ट्या बाकी आहेत. अर्थात उर्वरित महिन्यात आणखी सात दिवस बँका बंद राहणार आहेत.

तुम्हाला एखादे बँकेचे अत्यावश्यक काम असेल आणि ज्याकरता तुम्हाला बँकेच्या शाखेत जाणं अनिवार्य असेल, तर बँका कधी बंद आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे. जेणेकरून कोरोना लॉकडाऊन काळात होणारा खोळंबा टाळता येईल.

Advertisement

आरबीआयच्या वेबसाइटनुसार काही सुट्ट्या काही ठराविक राज्यात असतात, इतर राज्यांवर त्याचा परिणाम होत आहे. उदाहरणार्थ जर एखादा राज्यात ठराविक सण साजरा केला जातो, तर त्याची सुट्टी इतर राज्यांमध्ये दिली जाणार नाही.

अशा आहेत सुट्ट्या

Advertisement
  • 13 मे: रमजान ईद (ईद-उल-फितर). यादिवशी बेलापूर, जम्मू, कोचीन, मुंबई, नागपूर, श्रीनगर, तिरुवनंतपुरममध्ये इ. ठिकाणी बँका बंद असतील
  • 14 मे: भगवान श्री परशुराम जयंती / रमजान ईद (ईद-उल-फितर) / बसवा जयंती / अक्षय तृतीया (Akshaya Tritiya 2021) यादिवशी बेलापूर, जम्मू, कोचीन, मुंबई, नागपूर, श्रीनगर, तिरुवनंतपुरममध्ये इ. ठिकाणी बँका बंद असतील
  • 16 मे : रविवार (सर्व राज्यात सुट्टी)
  • 22 मे : चौथा शनिवार (सर्व राज्यात सुट्टी)
  • 23 मे : रविवार (सर्व राज्यात सुट्टी)
  • 26 मे : बौद्ध पौर्णिमा. या दिवशी आगरतळा, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, देहरादून, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर इ. ठिकाणी बँका बंद राहतील.
  • 30 मे : रविवार (सर्व राज्यात सुट्टी)

😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news

Advertisement