Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

स्फोट करून फोडले एटीएम

0 73

MHLive24 टीम, 21 जुलै 2021 :- एटीएम पळवून नेण्याचे प्रकार अनेकदा घडले. त्यातील रक्कम लंपास करण्यात आली; परंतु आता स्फोट करून एटीएम फोडायचे आणि त्यातील रक्कम लंपास करायची, हे तंत्र आता वापरले जात आहे. चाकणमध्ये असा प्रकार घडला.

व्यावसायिकांचे धाबे दणाणले :- भांबोली (ता.खेड) येथे हिताची कंपनीचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी स्फोट करून फोडले. नेमकी किती रक्कम चोरीला गेली? याची अधिकृत माहिती मिळाली नाही; परंतु स्फोटानंतर काही रक्कम आजूबाजूला विखुरली गेली असून काही रक्कम मशीनमध्ये सुरक्षित आहे. भर वर्दळीच्या रस्त्यालगत चोरीचा असा नवीन प्रकार घडल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

Advertisement

कुठे घडली घटना ? :- चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये भांबोली गाव आहे.येथे सोमनाथ पिंजण यांच्या मालकीच्या जागेत चाकण-वासुली फाटा रस्त्यालगत हिताची कंपनीचे एटीएम आहे. आज पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे.

काय घडले ? :- गाळा मालक सोमनाथ पिंजण यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी गॅस सिलेंडरच्या स्फोटासारखा मोठा आवाज झाला त्यामुळे मी बाहेर आलो असता अज्ञात दोन ते तीन इसम येथे होते. मला पाहता त्यांनी ‘इसको पेहले गोली मारो’ असे ओरडले.

Advertisement

मी एकटा असल्याने घाबरून घराकडे पळालो. त्यानंतर गावचे पोलिस पाटील आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. चाकण एमआयडीसी भागात नेहमी लहानमोठ्या चोऱ्या होत असता परंतु अशा प्रकारे स्फोट घडवून चोरी होण्याची पहिलीच घटना आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement