Good news for alcoholics : मद्यप्रेमींसाठी सरकारकडून खुशखबर ! ‘ती’ दारू स्वस्त होणार , शासनाने उचललं ‘हे’ पाऊल

MHLive24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- महाराष्ट्र सरकारने इम्पोर्टेड किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्कात ५० टक्के कपात केली आहे. त्यामुळे राज्यातील त्याची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने होईल.(Good news for alcoholics )

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. “स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्चाच्या 300 वरून 150 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे,” असे अधिकारी म्हणाले.

यासंदर्भातील अधिसूचना गुरुवारी जारी करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक 100 कोटी रुपयांचा महसूल मिळतो.

Advertisement

या कपातीमुळे सरकारचा महसूल 250 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे कारण याची विक्री एक लाख बाटल्यांवरून थेट 2.5 लाख बाटल्यांची विक्रीपर्यंत वाढेल अशी अपेक्षा आहे.

तस्करीला आळा घालणे

शुल्कात कपात केल्यामुळे इतर राज्यांतून होणारी स्कॉचची तस्करी आणि बनावट दारूच्या विक्रीलाही आळा बसणार आहे. उत्पादन शुल्कात कपात केल्याने महाराष्ट्रात आयात होणाऱ्या व्हिस्कीच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होईल. बातमीनुसार, सध्या एका दिवसात 1 लाख बाटल्या विकल्या जातात, शुल्क कमी केल्यामुळे बाटल्यांची विक्री अडीच लाखांवर पोहोचू शकते.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker