Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

दादरमध्ये तणाव; शिवसेना भवनसमोर भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा

0 0

MHLive24 टीम, 16 जून 2021 :-  शिवसेना-भाजपा यांच्यातील संघर्ष आता रस्त्यावर पाहायला मिळत आहे. दादरच्या शिवसेना भवनासमोरच भाजपा आणि सेनेचे कार्यकर्ते भिडले आहेत. राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपाला लक्ष्य केल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे.

भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मात्र शिवसेना भवनाच्या काही अंतरावरच पोलिसांनी त्यांना अडवले.

Advertisement

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेकडून टीका करण्यात आली होती.

शिवसेनेकडून घेण्यात आलेल्या भूमिकेविरोधात भाजपा जनता युवा मोर्चाकडून शिवसेना भवनच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. दरम्यान शिवसेना भवनच्या बाहेर भाजपाचं आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्तेत तिथे दाखल झाले. यादरम्यान शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले आणि तुफान हाणामारी झाली.

Advertisement

“भाजपाचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते शिवेसना भवनमध्ये जमले होते. भाजपाचे काही कार्यकर्ते दगडफेक करणार असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. यामुळे शिवसैनिकांनी त्यांना थाबवलं असता बाचाबाची झाली,” अशी माहिती स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे. शिवसेना भवनवर कोणी चाल करणार असेल तर प्रतिकार करणार हेच शिवसैनिकांनी माहिती असून तेच केलं आहे असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान अयोध्येतील राममंदिर उभारणीचे काम आणि त्यामागचा व्यवहार पारदर्शक, प्रामाणिक पद्धतीने व्हावा. रामभक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशयास्पद प्रकरण समोर आले. ते खरे की खोटे याचा लगेच खुलासा झाला तर बरे! राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे.

Advertisement

या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळ्याचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असा सल्ला शिवसेनेने दिला होता.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement