Break from exercise : व्यायामापासून एक दिवस तरी ब्रेक ह्या

MHLive24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- नियमित व्यायाम करत असाल, तर त्यापासून सुटी घेणेही अतिशय महत्त्वाचे आहे. सुटी घेतली नाही, तर आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. वजन कमी करायचे असेल किंवा डायबिटिस आणि हदयरोगाला लांब ठेवायचे असेल, तर तज्ज्ञ आहाराबरोबरच व्यायामाचा ही सल्ला देतात.(Break from exercise)

अमेरिकेतील फिटनेस फर्म ‘ एलआयडी मेथड ‘ यांचे म्हणणे मानले, तर जिममध्ये रोज घाम गाळण्यामुळे फायदा कमी आणि नुकसान जास्त होऊ शकते. संशोधकांनी दोन हजार लोकांचा अभ्यास करून आठवड्यात कमीत कमी एक दिवस व्यायामातून ब्रेक घेण्याचा सल्ला दिला आहे.

ऊतींच्या दुरुस्तीला वेळ मिळेल 

Advertisement

प्रमुख संशोधक टेलर नॉरीस यांच्या म्हणण्यानुसार, व्यायाम करताना हाडे आणि स्नायूंवर खूप दबाव पडतो. त्यामुळे ऊती तुटण्याचा आणि फाटण्याचा धोका असतो. तथापि, व्यक्‍तीने जर आठवड्यातून एक दिवस सुटी घेतली, तर ऊतीं नाही आराम मिळतोच. त्याबरोबरच शरीरही त्यांच्या दुरुस्तीसाठी वेळ काढते.

नॉसिस यांनी हे सुद्धा सांगितले की, रोज रोज जास्त वेगाने व्यायाम करणे आणि शरीराला ऊतींची दुरुस्ती करण्याची संधी न दिल्याने हाडे आणि स्नायूंची झीज होण्याची तक्रार होऊ शकते. त्यामुळे व्यक्‍ती फ्रॅक्‍चरविषयी जास्त संवेदनशील होऊ शकते.

स्नायूंमध्ये जखम होण्याची शक्‍यता कमी होईल. संशोधनात असे दिसले की, व्यायामाच्या रूटीनमध्ये सुटी घेतली नाही, तर शरीर खूपच जास्त प्रमाणात थकण्याची शक्‍यता असते. त्यामुळे व्यक्‍ती केवळ स्नायूंमध्ये तणाव होण्याच्या आणि सांधेदुखीच्या समस्येशी झगडू लागते असे नाही, तर भावनात्मक स्तरावरही वाटू लागते.

Advertisement

या स्तरावर पोहोचल्यास व्यायामापासून लांब राहण्याची वेळ येऊ शकते. मॉरिस यांनी दावा केला की, मोठमोठे खेळाडू ही ब्रेक घेण्यास, आपला व्यायाम आणि सराव रूटीनचा एक आवश्यक भाग समजतात.

मेंदूलाही हवा आतम 

व्यायाम करताना शरीरात स्ट्रेस हार्मोन ‘ कॉर्टिसोल ‘ चा स्राव वाढतो. त्यातून मेंदूला हा संदेश जातो की, शरीर कठीण परिस्थितीतून जात आहे. ते ग्लुकोज भविष्यात वापरण्यासाठी जतन करू लागते. त्याचा परिणाम म्हणून फॅट आणि कार्बोहायड्रेटची ऊर्जेत रूपांतरित होण्याची गती खूप कमी होते.

Advertisement

नवीन ऊर्जा जमविणे शक्‍य होईल 

संशोधकांना आढळले की, व्यायामात ब्रेक घेणे स्नायूंचे घनत्व वाढविण्यासाठी ही परिणामकारक ठरते. त्यामुळे शरीर नवीन ऊर्जे सह व्यायाम करण्यास प्रेरित होते. त्यांनी ब्रेकच्या दिवशी चांगली झोप घेणे आणि आवडीच्या फिल्म्स पाहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ‘ फील गुड ‘ हार्मोनचा स्राव वाढेल आणि दुरुस्तीची गती वाढू शकेल.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker