Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

सुपरस्टार रजनीकांत यांची राजकारणात एन्ट्री; या दिवशी करणार मोठी घोषणा

Mhlive24 टीम, 03 डिसेंबर 2020 : – दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत येत्या नवीन वर्षात राजकीय कारकिर्दीची दमदार नवी सुरुवात करणार आहेत. या वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 डिसेंबरला राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत.

Advertisement

रजनीकांत यांनी आज एक ट्विट करत ही घोषणा केली आहे. मी जानेवारीमध्ये नव्या पक्षाची स्थापना करणार असून, त्याची घोषणा 31 डिसेंबर रोजी करण्यात येईल, असे रजनीकांत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर तमिळनाडूच्या राजकारणात निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांची सक्रियता वाढली आहे. तमिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीपूर्वी दाक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणातील एन्ट्रीबाबत वक्तव्य समोर आले होतेत्यांच्या या वक्तव्यावरून संकेत मिळाले होते की, रजनीकांत विधानसभा निवडणूक लढू शकतात. 2021 मध्ये तमिळनाडू विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत.

Advertisement

या निवडणूकांमध्ये रजनीकांत आणि त्यांच्या संघटनेची नेमकी भूमिका काय असणार? याबाबत अद्याप कोणतीच स्पष्टता मिळालेली नाही. रजनीकांत यांनी आपल्या वक्तव्यामध्ये म्हटले होते की, सर्वात आधी ते रजनी मक्कल मंडरमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील, त्यानंतरच विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, यासंदर्भात निर्णय घेण्यात येतील.

Advertisement

रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. परंतु, अधिकृतरित्या अद्याप त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला नाही. दरम्यान, गेल्या वर्षी अभिनेता कमल हसन आणि रजनीकांत यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर हे दोघेही एकत्र येऊन राजकारणाची इनिंग खेळणार असल्याच्या चर्चांनी तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ माजली होती.

Advertisement

केंद्रातील सत्ताधारी भाजपाही तामिळनाडूमध्ये आपला पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. रजनीकांत यांनाही आपल्याकडे ओढण्याचा भाजपाकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र अमित शाहांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यादरम्यान दोघांचीही भेट होऊ शकली नव्हती.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li