Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

शेतीपूरक अशा युनिक बिझनेस आयडिया; होईल चांगली कमाई

0 108

MHLive24 टीम, 22 जुलै 2021 :-  हा कृषिप्रधान देश आहे, ७० टक्के जनता शेतीवर अवलंबुन आहे. वास्तविक पाहता सद्यस्थितीत ५३% लोकसंख्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेती व्यवसायावर अवलंबुन आहे.

वाढते औद्योगीकरण,शहरीकरण, माहीती तंत्रज्ञानातील क्रांती, सेवा विभागातील विकास या गोष्टी कृषी क्षेत्राचे स्थलांतर करण्यास कारणीभुत असतीलच पण हवानातील अनियमीतपणा, शेती बाजाराला योग्य भाव न मिळणे, अल्पभुधारकता अशा एक नाही अनेक प्रश्नांमुळे शेतीकडे पाठ फिरवली जाऊन लोक शहरीकरणाकडे वळत आहेत.

Advertisement

यासाठी शेतीला आता एक फायदेशीर व भरवश्याचा जोडधंदा असणे गरजेचे आहे व यालाच शेतमाल प्रक्रिया उद्योग हा सर्वोत्तम पर्याय असु शकतो. यासाठी फळांपासून जॅम बनवता येऊ शकतात.

जॅम बनवण्याची प्रक्रिया :- ज्या फळांपासून चांगला गर निघतो त्यापासून जॅम बनविता येतो. त्यामुळे जॅम बनविण्यासाठी असा गर निघणाऱ्या फळांची निवड करणे गरजेचे आहे. या भागात आपण विविध फळांपासून मिक्स फ्रुट जॅम तयार करण्याची पध्दत पाहू.

Advertisement

सफरचंदाप्रमाणेच पीअर्स, पीचेस, आलू बोखारा, अननस, पिकलेला आंबा, पपई अशा फळांमध्ये जॅम बनविण्यासाठी आवश्यक असणारे पेक्टीनही असते. सफरचंदाप्रमाणेच साल व बिया काढून तसेच लहान तुकडे करुन मिक्सरमधून या फळांचा गर काढता येतो.

संत्रा, मोसंबी, द्राक्षे, स्ट्रॉबेरी यांच्यापासून निघणार रस पातळ असल्याने अशा एका फळापासून जॅम न ब‌नविता या फळांचा मिक्स फ्रुट जॅममध्ये समावेश करता येतो.

Advertisement

फळांमधील पेक्टिन काढणे :-  फळांच्या फोडी जाड बुडाच्या स्टीलच्या केटल अथवा भांड्यात घेऊन त्यात फळांच्या प्रकारानुसार मोजून पाणी घालावे. पाण्याचे प्रमाण हे त्या त्या फळांमध्ये असलेल्या आम्लता, पेक्टिन आणि फळांचा कमी अधिक टणकपणा यावर अवलंबून असते. फळांच्या फोडी, पाणी आणि आम्लता (सायट्रिक ॲसिड) १/३ प्रमाणात टाकून उकळण्यास ठेवावे.

हे मिश्रण साधारण २० ते २५ मिनिटे उकळावे. वेळेपेक्षा जास्त उकळल्यास फळांचा रंग, सुवास यावर परिणाम होतो. उकळलेले मिश्रण स्वच्छ कपड्यातून गाळून घ्यावे. गाळताना दाबत गाळू नये. नाहीतर फळांचा गर त्यात उतरतो व जेली पारदर्शक होत नाही. अर्कातील पेक्टिनच्या प्रमाणावर साखरेचे प्रमाण ठरविले जाते.

Advertisement

जेली तयार करणे :- अर्क, अर्काच्या प्रमाणात मोजून घेतलेली साखर आणि राहिलेले सायट्रिक आम्ल टाकून मिश्रण उकळण्यासाठी ठेवावे. मिश्रण उकळण्यासाठी इलेक्ट्रिक स्टरर अथवा स्टील केटलचा वापर करावा. मिश्रण उकळण्यासाठी उष्णतेवर, वाफेवर किंवा वीजेवर चालणाऱ्या शेगडीचा वापर
करता येतो.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement