Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

अजबच ! ‘ह्या’ केवळ एका अंड्यात संपूर्ण कुटुंबाचा होईल नाश्ता

0 6

MHLive24 टीम, 05 जुलै 2021 :- जगभरातील कित्येक लोक सकाळच्या नाश्त्याला अंड खाणे पसंत करतात. कारण अंडे स्वादिष्ट आणि पौष्टिक असल्याने आपल्या शरीरासाठी लाभदायक असते. दररोज अंडे खाल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी कमी होण्यास मदत होते. पण असे एक अंडे आहे ज्यात संपूर्ण कुटुंबाचा नाश्ता होऊ शकतो.

जगातील सर्वात मोठा पक्षी शहामृग याच्या अंड्याविषयी आपण बोलत आहोत. एका संपूर्ण कुटुंबाचा नाश्ता या अंड्यात होऊ शकतो हे खरेच आहे पण त्यासाठी अंडे शिजेपर्यंत धीर धरण्याची तयारी मात्र हवी.

Advertisement

कोंबडीचे अंडे उकडायला फारतर १० मिनिटे लागतात पण शहामृगाचे अंडे उकडण्यासाठी ५० मिनिटे ते दीड तास प्रतीक्षा करावी लागते.

अंड्याचे टरफल मऊ असेल तर ५० मिनिटे, कडक असेल तर दीड तास. हे अंडे दिसायला कोंबडीच्या अंड्यासारखेच आहे फक्त त्याचा आकार प्रचंड म्हणजे साधारण कोंबडीच्या २४ अंड्याइतका असतो.

Advertisement

जगातील सर्वात मोठ्या आकाराचा पक्षी मानला जाणारा शहामृगांना उडता येत नसले, तरी ते कमालीच्या वेगाने धावू शकतात. हा पक्षी ताशी ६५ किमीपर्यंतच्या वेगाने धावू शकतो. धावताना दिशा बदलण्यासाठी ते पंखांचा उपयोग करू शकतात.

शहामृगाचे पाय लांब आणि मजबूत असतात, त्यामुळे एका पावलात १० ते १६ फूट अंतर ते कापू शकतात. शहामृगांचे अंडे अतिशय स्वादिष्ट आणि पोषक आहे. त्याचे वजन १ ते १.३ किलो इतके असते.

Advertisement

प्रत्येक अंड्यातून २ हजार कॅलरी मिळतात. त्यामुळे त्याची अंडी सुद्धा हेल्दी असतात. त्यात सॅच्युरेटेड फॅटस आणि कोलेस्टेरॉल कोंबडीच्या अंड्यापेक्षा सुद्धा कमी असते. हे अंडे ६ ते १५ सेंटीमीटर व्यासाचे असते.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement