शेअर मार्केटचे किंग राकेश झुनझुनवाला खरेदी करणार 70 विमाने; वाचा त्यांचा आगामी जबरदस्त प्लॅन

MHLive24 टीम, 29 जुलै 2021 :- भारतीय अब्जाधीश आणि शेअर बाजारामधील किंग राकेश झुनझुनवाला आता एअरलाइन्स व्यवसायात प्रवेश करण्याची तयारी करत आहे. झुनझुनवाला चार वर्षांत नव्या विमान कंपनीसाठी 70 विमान खरेदी करण्याची योजना करत आहे.

ब्लूमबर्गशी बोलताना राकेश झुनझुनवाला म्हणाले की, ते 35 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. अशाप्रकारे, विमान कंपनीत त्यांची 40% मालकी असेल, त्यांना येत्या 15 दिवसांत विमानन मंत्रालय, भारत सरकारकडून एनओसी प्रमाणपत्र मिळण्याची अपेक्षा आहे.

राकेश झुंझुनवाला म्हणाले की, अल्ट्रा-लो कॉस्ट एयरलाइन ला ‘अकासा एयर’ म्हणून ओळखली जाईल. एअरलाइन्स क्षेत्राला भाड्यामधील स्पर्धेचा आणि कोरोनाचा जोरदार फटका बसला आहे , झुनझुनवाला यांची या क्षेत्रात प्रवेश करणे खूप आव्हानात्मक आहे. झुनझुनवाला मात्र या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत आणि येत्या काही दिवसांत विमानचालन क्षेत्रात मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या मते भारतीय बाजारात वाढ कायम राहील.

Advertisement

कोरोना काळात सर्व जगात विमानचालन उद्योगावर परिणाम झाला आहे. हवाई प्रवासाच्या मागणीवर परिणाम झाला आहे. सध्या कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या भीतीने भारतातील हा धोका टळलेला दिसत नाही. असे असूनही झुंझुनवाला हे आव्हान स्वीकारण्यास तयार आहे. फोर्ब्सच्या मते, झुनझुनवालाची अंदाजे निव्वळ संपत्ती सुमारे 4.6 बिलियन डॉलर आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker