Business Idea: स्वतःचा व्यवसाय सुरू करा, अन 15 लाख रुपये कमवा; जाणून घ्या संपून प्रक्रिया

MHLive24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- आज कोरोनाने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे अनेकांना स्वतःचा बिझनेस करायचा आहे. जर तुम्हालाही तुमचा व्यवसाय करायचा असेल पण तुम्हाला काही आयडिया सुचत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला एक उत्तम बिझनेस आयडिया देणार आहोत.(Business Idea)

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला थोडी गुंतवणूक करावी लागेल आणि त्यातून तुम्ही भरपूर कमाई करू शकता.

सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की कोणीही हा व्यवसाय सहजपणे सुरू करू शकतो. चला या व्यवसायाबद्दल सर्व काही जाणून घेऊया.

Advertisement

खुप मागणी असणारा व्यवसाय

लॉकडाऊनच्या काळातही हा व्यवसाय उत्तम कमाई करणारा ठरला आहे. हे असे उत्पादन आहे ज्याला गावांपासून शहरांपर्यंत प्रचंड मागणी आहे. आपण या ठिकाणी टोमॅटो शेतीच्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत. तुमची छोटी शेती असेल किंवा तुम्हाला शेतीची आवड असेल, तर तुम्ही शेत भाड्याने घेऊन मोठी कमाई करू शकता.

टोमॅटोची लागवड कशी करावी

Advertisement

टोमॅटोची लागवड साधारणपणे वर्षातून दोनदा केली जाते. एक जुलै-ऑगस्टपासून सुरू होते आणि फेब्रुवारी-मार्चपर्यंत चालते. दुसरी नोव्हेंबर-डिसेंबरपासून सुरू होतो आणि जून-जुलैपर्यंत चालते. टोमॅटोच्या लागवडीमध्ये सर्वप्रथम बियाण्यापासून रोपवाटिका तयार केली जाते.

साधारण एका महिन्यात रोपे शेतात लावण्यासाठी योग्य होतात. एक हेक्टर शेतात सुमारे 15,000 रोपे लावली जातात. शेतात लागवड केल्यानंतर साधारण 2-3महिन्यांनी फळे येऊ लागतात. टोमॅटोचे पीक 9-10 महिने टिकते.

किती खर्च येईल

Advertisement

टोमॅटोच्या अनेक प्रजाती आहेत. बांबू आणि तारेच्या साहाय्याने रोपे बांधल्यास जास्त उत्पन्न मिळते. अशा स्थितीत तुमच्या बियाणे आणि इतर सर्व खर्चासह अडीच लाख ते तीन लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

त्यासाठी 40,000 ते 50,000 रुपये बियाणे, 25,000 ते 30,000 रुपये किमतीची तार, 40,000 ते 45,000 रुपये किमतीचे बांबू, मल्चिंग पेपर आणि सुमारे 20,000 ते 25,000 रुपये मजुरीची किंमत लागते. एक एकरमधून टोमॅटोच्या लागवडीत 300-500 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. म्हणजेच एका हेक्टरमधून 800-1200 क्विंटल टोमॅटोचे उत्पादन होऊ शकते.

15 लाखांपर्यंत कमाई

Advertisement

एका हेक्टरमध्ये 800-1200 क्विंटल टोमॅटोचे उत्पादन घेता येते. विविध जातींनुसार उत्पादन बदलते. म्हणजेच, जर टोमॅटोची सरासरी 15 रुपये किलोने विक्री झाली आणि सरासरी 1000 क्विंटल उत्पादन झाले, तर तुम्हाला 15 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker