Business Idea: सरकारच्या मदतीने सुरु करा ‘हा’ व्यवसाय , दरमहा लाखोंची कमाई

MHLive24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- अनेकांना स्वतःचा व्यवसाय करायचा असतो. परंतु काही खास आयडिया नसते. असा लोकांसाठी हि खास बातमी आहे. केंद्र सरकार तुम्हाला व्यवसायाची जबरदस्त संधी देत आहे. या व्यवसायात तुम्हाला भरपूर कमाई देखील होईल.(Business Idea)

केंद्र सरकार लोकांना प्रधान मंत्री भारतीय जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. तुम्हालाही कमी खर्चात मोठा कमाईचा व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. येथे आम्ही तुम्हाला या व्यवसायाची माहिती सांगत आहोत.

येथून फॉर्म डाउनलोड करा

Advertisement

जनऔषधी केंद्र तुम्हाला या फायदेशीर व्यवसायासाठी एक जबरदस्त संधी देत आहे. यामध्ये तुम्ही कमी खर्चात जास्त कमाई करू शकता. त्यासाठी प्रथम जनऔषधी केंद्राच्या नावाने ‘किरकोळ औषध विक्री’चा परवाना घ्यावा लागेल.

यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट https://janaushadhi.gov.in/ वरून फॉर्म डाउनलोड करू शकता. फॉर्म डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला ब्युरो ऑफ फार्मा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ इंडियाच्या जनरल मॅनेजर (A&F) च्या नावाने अर्ज पाठवावा लागेल.

जनऔषधी केंद्र कोण उघडू शकतो ?

Advertisement

जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी सरकारने तीन कॅटेगिरी तयार केल्या आहेत. पहिल्या कॅटेगिरी मध्ये, कोणतीही व्यक्ती, बेरोजगार फार्मासिस्ट, डॉक्टर किंवा नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी जन औषधी केंद्र उघडण्यास पात्र आहेत. दुसऱ्या कॅटेगिरीमध्ये ट्रस्ट, स्वयंसेवी संस्था, खाजगी रुग्णालये, बचत गट येतात. आणि तिसर्‍या श्रेणीत, राज्य सरकारांनी नामनिर्देशित केलेल्या एजन्सींना संधी मिळते.

नॉर्मल आणि स्पेशल इंसेंटिव

जनऔषधी केंद्र उघडण्यासाठी दुकानातील फर्निचरसाठी 1.5 लाख रुपयांपर्यंत खर्च येईल. त्याचबरोबर संगणक आणि फ्रीजसाठी 50 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. 2 लाखाची रक्कम पूर्ण होईपर्यंत ही रक्कम मासिक आधारावर 15,000 रुपयांप्रमाणे परत केली जाते. हे इंसेंटिव मासिक खरेदीच्या 15% किंवा 15000 यापैकी जे जास्त असेल त्या आधारावर दिले जाते.

Advertisement

अशी होते कमाई ?

जनऔषधी केंद्राच्या व्यवसायात कमाई चांगली आहे. ते उघडल्यानंतर औषध विक्रीवर 20 टक्के मार्जिन दुकानदारांना दिले जाते. इतकेच नाही तर त्यात सामान्य आणि विशेष सवलतींचीही तरतूद आहे. सामान्य प्रोत्साहनाच्या स्वरूपात, सरकार औषध दुकान उघडण्याच्या खर्चाची परतफेड करते.

काय आहे स्कीम ?

Advertisement

जनऔषधी केंद्र ही एक अशी स्कीम आहे ज्या अंतर्गत सर्वसामान्यांना कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जातात. याद्वारे केंद्र सरकार जनतेला स्वस्त दरात औषधे पुरवते. या योजनेद्वारे केंद्र सरकार लोकांना देशाच्या विविध भागात ‘प्रधानमंत्री जन औषधी केंद्र’ उघडण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. सरकारने मार्च 2024 पर्यंत 10,000 जन औषधी केंद्रे सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker