परमबीर सिंह यांच्याविरोधातील गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष पथक नियुक्त

MHLive24 टीम, 29 जुलै 2021 :-  मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचे नेतृत्व उपायुक्त निमित गोयल करतील. त्यांच्यासमवेत एसआयटीमध्ये एसीपी आणि अन्य पाच निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत.

परमबीरांच्या निकटवर्तीयांची उचलबांगडी :- परमबीर यांच्या पाच निकटवर्तीय पोलिस अधिकाऱ्यांची एकाच वेळी बदली करण्यात आली आहे. दोन उपायुक्त, दोन सहायक आयुक्त आणि एका महिला पोलिस निरीक्षकाचा त्यात समावेश आहे. या सर्वांवर परमबीर यांच्यासोबत खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे.

कोणाकोणाची बदली ? :- पोलिस उपायुक्त अकबर पठाण, पोलिस उपायुक्त पराग मानारे, सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत शिंदे, पोलिस निरीक्षक आशा कोंरके

Advertisement

टाकले साईड पोस्टिंगला :- परमबीर यांच्यासह इतरांवर मुंबईत आणि ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मरिन ड्राईव्ह आणि कोपरी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील सर्व पाच अधिकाऱ्यांना स्थानिक शस्त्रास्त्र विभागात पाठवले गेले आहे. याला साईड पोस्टिंग विभागदेखील मानले जाते.

विशेष पथकात कोण ? :- निमित गोयल (पोलिस उपायुक्त), एम एम मुजावर (सहाय्यक पोलिस आयुक्त), प्रिणम परब (पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा), सचिन पुराणिक,(पोलिस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक), विनय घोरपडे (पोलिस निरीक्षक), महेंद्र पाटील (सहाय्यक पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा), विशाल गायकवाड (सहाय्यक पोलिस निरीक्षक, पश्चिम विभाग सायबर पोलिस ठाणे)

काय आहे प्रकरण ? :- भाईंदर येथील विकासक (बिल्डर) श्याम सुंदर अग्रवाल यांनी मरीन ड्राईव्ह पोलिसात तक्रार केली होती. परमबीर आणि मुंबई पोलिस दलातील पाच अधिकाऱ्यांविरुद्ध 15 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अग्रवाल यांच्या विरोधात मुंबईतील जुहू पोलिस ठाण्यात मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपाससुद्धा याच एसआयटीकडून केला जाणार आहे.

Advertisement

शरद अग्रवाल यांचाही आरोप :- दुसरीकडे, परमबीर यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप शरद अग्रवाल यांनी केला आहे. अग्रवाल यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागून जमिनी बळजबरीने नावावर करण्यात आल्याच्या आरोपाखाली ठाणे शहरातील कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर यांच्यासोबत संजय पुनामिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि उपायुक्त पराग मणेरे असे सहआरोपी आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक फूलपगारे करत आहेत.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker