News for FD investors : FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खास बातमी; ‘ह्या’ विशेष स्कीमचा अवश्य फायदा घ्या

MHLive24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- एफडी हे अत्यंत लोकप्रिय गुंतवणुकीचे ऑप्शन आहे. विशेतः सेवानिवृत्तीनंतर मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजातून घर खर्च चालवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकासांठी हे अत्यंत महत्वाचं आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे अनेक बँकांनी मुदत ठेवींवरील व्याज कमी केले आहे.(News for FD investors)

त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे व्याजाचे उत्पन्नही कमी झाले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना घरखर्च चालवणे कठीण होत आहे. मात्र SBI सह इतर दोन बँकांनी ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यासाठी विशेष मुदत ठेव योजना सुरू केली आहे.

ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सामान्य एफडीपेक्षा जास्त व्याज मिळते. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे उत्पन्न वाढवायचे असेल तर ते विशेष एफडी योजनेत गुंतवणूक करू शकतात. SBI सह इतर दोन बँकांच्या या योजनांबद्दल जाणून घेऊया.

Advertisement

एसबीआय वीकेअर डिपॉझिट – या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 80 बेस पॉइंट अधिक व्याज मिळते. SBI च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ही योजना 31 मार्च 2022पर्यंत असेल. SBI ने मे 2020 मध्ये वीकेअर डिपॉझिट योजना सुरू केली. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सामान्य FD पेक्षा 0.30 टक्के अतिरिक्त व्याज मिळते.

एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने विशेष FD योजनेंतर्गत मुदत ठेव ठेवल्यास, FD वर लागू होणारा व्याज दर 6.20 टक्के असेल. एसबीआय वेकेअर डिपॉझिट अंतर्गत मिळालेल्या अतिरिक्त व्याजाचा लाभ नवीन खाती उघडणे आणि ठेवीचे नूतनीकरण दोन्हीवर उपलब्ध असेल.

ICICI बँक गोल्डन इयर FD – ICICI बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी गोल्डन इयर FD योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सध्याच्या 0.50 टक्के वार्षिक दराव्यतिरिक्त मर्यादित कालावधीसाठी 0.20 टक्के अतिरिक्त व्याज दर मिळतो. तर गोल्डन इयर एफडीमध्ये, ज्येष्ठ नागरिक किमान 5 वर्षे आणि कमाल 10 वर्षांसाठी मुदत ठेव करू शकतात.

Advertisement

तसेच, ज्येष्ठ नागरिक ICICI बँकेच्या गोल्डन इयर एफडी योजनेत जास्तीत जास्त 2 कोटी रुपयांची एफडी ठेऊ शकतात. ज्यावर त्यांना वार्षिक 6.30 टक्के दराने व्याज मिळेल. ही योजना 8 एप्रिल 2022 पर्यंत लागू आहे.

एचडीएफसी सीनियर सिटीझन केअर – देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसीनेही ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना सुरू केली आहे. ज्याला सिनियर सिटीझन केअर म्हणतात. ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेत गुंतवणूक केल्यास त्यांना 75bps अधिक व्याज मिळते. तसेच, HDFC बँक सीनियर सिटीझन केअर FD अंतर्गत मुदत ठेवींवर 6.25 टक्के व्याज मिळेल.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker