Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

काेराेनाग्रस्त महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या डाॅक्टरसोबत झाले असे काही…

Advertisement

Mhlive24 टीम, 04 मार्च 2021:काेराेनाबाधित महिलेला मध्यरात्री केबिनमध्ये बाेलावून घेत शरीरसुखाची मागणी करणाऱ्या मनपाच्या एका डाॅक्टरला रुग्णांनी बदडून काढत धडा शिकवला. औरंगाबादच्या पदमपुरा काेविड सेंटरमध्ये मंगळवारी रात्री हा प्रकार घडला.

बदनामीच्या भीतीने सदर महिलेने पाेलिसांत तक्रार देणे टाळले, मात्र मनपाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. त्यावरून आराेग्य अधिकाऱ्यांनी तातडीने या डाॅक्टरची सेवा खंडित केली आहे.

Advertisement

ही ३४ वर्षीय महिला मनपाच्या काेविड केअर सेंटरमध्ये २३ फेब्रुवारीला भरती झा

ली हाेती. उपचाराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ३ मार्चला डिस्चार्ज मिळणे अपेक्षित हाेते.

Advertisement

या सेंटरमध्ये रात्रपाळीस कामाला असलेल्या डाॅक्टरने २ मार्च राेजी मध्यरात्री १.१७ वाजता माेबाइलवर फाेन करून या महिलेला केबिनमध्ये बाेलावून घेतले.

‘तुमचे डिस्चार्ज पेपर तयार करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला आणखी तीन दिवस इथे थांबावे लागेल,’ असे त्या डाॅक्टरने रुग्ण महिलेला सांगितले.

Advertisement

त्यावर कुटुंबाची ओढ लागलेल्या महिलेने उद्याच डिस्चार्ज द्या, अशी विनवणी केली. त्यावर ‘तुझी विनंती मान्य करायची असेल तर मी सांगताे तसे कर’ असे म्हणत या डाॅक्टरने संबंधित महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली.

या प्रकाराने रुग्ण महिलेची भीतीने गाळण उडाली. डाॅक्टरला नकार देत ती आपल्या वाॅर्डात पाेहाेचली. डाॅक्टरही तिच्या मागाेमाग आला. मात्र महिलेने त्याला तेथून परत पाठवले. डाॅक्टरने १.५३ वाजता दुसरा काॅल केला.

Advertisement

यादरम्यान महिलेने नातेवाइकाला फाेन करून डाॅक्टर त्रास देत असल्याचे सांगितले. त्यानंतरही २.४१ वाजता डाॅक्टरने तिसरा काॅल केला, मात्र महिलेने त्याला दाद दिली नाही.

सदर महिलेने काैटुंबिक अडचणींमुळे, बदनामीच्या भीतीने पाेलिसांत तक्रार दिली नाही. महापालिकेच्या आराेग्य अधिकारी डाॅ.नीता पाडळकर यांच्या नावे मात्र लेखी तक्रार दिली.

Advertisement

पाईकराव यांनीही फाेन करून डाॅ. पाडळकर यांना घडला प्रकार सांगितला. त्यांनी बन्सीलालनगरच्या आराेग्य अधिकारी डाॅ. भामरे यांच्यामार्फत चाैकशी संबंधित डाॅक्टरचे काम तातडीने थांबवले.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement