कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल ‘इतक्या’ डॉक्टरांचा मृत्यू !

MHLive24 टीम, 6 जून 2021 :-  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढीसोबत बळींचा आकडा चिंताजनक ठरला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये सामान्य नागरिकांसोबतच वैद्यकीय कर्मचारी, परिचारिका, डॉक्टर्स यांचा समावेश आहे.

भारतीय वैद्यकीय संघटनेने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ६४६ डॉक्टरांनी जीव गमावला आहे. डॉक्टरांचे सर्वाधिक मृत्यू दिल्लीत झाले. देशाच्या राजधानीत १०९ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

Advertisement

बिहारमध्ये ९७, उत्तरप्रदेशात ७९, राजस्थानमध्ये ४३, झारखंडमध्ये ३९, गुजरातमध्ये ३७, आंध्रप्रदेशात ३५, तेलंगणात ३४, तामिळनाडूत ३२, पश्चिम बंगालमध्ये ३०, महाराष्ट्र व ओडिशात प्रत्येकी २३ तर मध्यप्रदेशात १६ डॉक्टर आतापर्यंत दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे दगावले आहेत.

पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्थेवरील ताण अधिक होता. दैनंदिन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे रुग्णालयांमध्ये खाटा, औषधे, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. आता रुग्णसंख्येत मोठी घट झाली असली तरी अद्याप बळींची संख्या चिंताजनक आहे.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement