Smartwatch with big display : लॉन्च होणार मोठा डिस्प्ले असलेले ‘हे’ स्मार्टवॉच ! कमी किमतीत आश्चर्यकारक फीचर्स

MHLive24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- आजकालचा जमाना स्मार्ट झाला आहे. फोनप्रमाणेच आता घड्याळदेखील स्मार्ट वापरणे लोकांना आवडू लागले आहे. अलिकडच्या काळात, लोकांमध्ये स्मार्टवॉचची लोकप्रियता खूप वाढली आहे. जर तुम्ही देखील एक चांगले स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हि बातमी महत्वाची आहे.(Smartwatch with big display)

Huawei कंपनी या महिन्यात त्यांचे नवीन स्मार्टवॉच Huawei Watch D लाँच करू शकते. हे स्मार्टवॉच उत्तम बॅटरी लाइफसह अनेक आश्चर्यकारक फीचर्ससह सुसज्ज आहे. त्याबद्दल सर्व काही जाणून घेऊया.

Huawei नवीन स्मार्टवॉच लॉन्च करणार आहे

Advertisement

चीनी कंपनी Huawei आपले नवीन स्मार्टवॉच Huawei Watch D या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये लॉन्च करू शकते. , Huawei Watch D 23 डिसेंबरला लॉन्च केला जाऊ शकतो. पण कंपनीकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यामध्ये, ब्लड प्रेशर मॉनिटरसह अनेक मनोरंजक फीचर्स मिळू शकतात.

Samsung Galaxy Watch 4 ला टक्कर

XDA डेव्हलपर्सच्या रिपोर्टनुसार, Huawei चे हे स्मार्टवॉच अनेक वैशिष्ट्यांच्या बाबतीत Samsung Galaxy Watch 4 सारखे असू शकते. सॅमसंगच्या स्मार्टवॉचप्रमाणेच यामध्ये तुम्हाला ब्लड प्रेशर मॉनिटरही मिळू शकतो.

Advertisement

तसेच, या अहवालात असेही म्हटले आहे की Huawei च्या स्मार्टवॉचची वैशिष्ट्ये सॅमसंगच्या घड्याळाशी जुळत असली तरी किमतीच्या बाबतीत Huawei वॉच डी सॅमसंग गॅलेक्सी वॉच 4 पेक्षा स्वस्त असू शकते.

Huawei Watch D ची फीचर्स

सध्या कंपनीकडून कोणतीही बातमी समोर आलेली नाही, परंतु लीक झालेल्या बातम्यांनुसार, हे स्मार्टवॉच आयताकृती डिस्प्ले आणि दोन बटणांसह येईल जे ‘होम’ आणि ‘हेल्थ’ या दोन पर्यायांच्या वापरासाठी दिलेले आहेत. यामध्ये दिलेल्या ब्लड प्रेशर मॉनिटरमध्ये एक खास फीचर देण्यात आले आहे, ज्यामुळे यूजर्स ब्लड प्रेशर हिस्ट्री तपासू शकतात.

Advertisement

सध्या या स्मार्टवॉचबद्दल कोणतीही अधिक माहिती समोर आलेली नाही, परंतु अंदाजे लॉन्चची तारीख जवळ असल्याने, कंपनी लवकरच या स्मार्टवॉचबद्दल माहिती जाहीर करेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते. हे स्मार्टवॉच सध्या फक्त चीनमध्ये रिलीज केले जाईल.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker