Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

सोन्या-चांदीच्या किंमतीत किंचित वाढ, जाणून घ्या सविस्तर

0

MHLive24 टीम, 9 जून 2021 :- रुपयाच्या विनिमय दरात घसरण झाली असून दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव 190 रुपयांनी वाढून 48,320 रुपयांवर आला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. गेल्या व्यापार सत्रात सोन्याचा दर 10 ग्रॅम 48,130 रुपयांवर बंद झाला होता.

त्याचप्रमाणे चांदीदेखील 125 रुपयांनी वाढून 70,227 रुपये प्रति किलो झाली. मागील सत्रात चांदीचा बंद भाव प्रति किलो 70,102 रुपये होता. मंगळवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया नऊ पैशांनी घसरून 72.89 वर आला.

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत :- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव घसरून प्रति औंस 1,890 डॉलर राहिला, चांदी प्रति औंस 27.65 डॉलरवर स्थिरआहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (जिंस) तपन पटेल यांनी सांगितले की, विदेशी जिंस बाजारात सोन्याच्या किंमती गेल्या औपचारिक सत्रात 1,900 डॉलर प्रति औंसच्या उच्चांकावर जाऊन खाली आली.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा कोणत्या दराने व्यापार होत आहे ते जाणून घ्या :- आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा तेजीमध्ये व्यापार होत आहे. अमेरिकेत सोन्याचा भाव प्रति औंस 0.18 डॉलरच्या वाढीसह 1,894.08 डॉलरवर आला. दुसरीकडे, चांदी 0.02 डॉलरच्या वाढीसह 27.66 डॉलरच्या पातळीवर व्यापार करीत आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit