ताथवडे येथील हाॅटेलमधून साडेसहा लाखांचा मद्यसाठा जप्त

MHLive24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- हॉटेलमधून सहा लाख ४५ हजार ७५५ रुपयांचा अवैध मद्यसाठा व एक हजार २०० रुपयांची रोकड जप्त केली. मुंबई -बंगळूर महामार्गालगत निंबाळकरनगर, ताथवडे येथील हॉटेल कोल्हापुरी व्हेज-नॉनव्हेजवर छापा टाकला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली.

अवैधरित्या मद्यसाठा :- हॉटेलचा मालक अशोक मोहनलाल चौधरी (वय ३३, रा. पवनानगर, चिंचवडगाव), हॉटेलचा व्यवस्थापक प्रकाश विलास गायकवाड (वय २४, रा. ताथवडे), अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-बंगळूर महामार्गालगत निंबाळकरनगर, ताथवडे येथील हॉटेल कोल्हापुरी व्हेज-नॉनव्हेज येथे अवैधरित्या मद्यसाठा करून ग्राहकांना विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानसार सामाजिक सुरक्षा पथकाने सापळा रचून हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत एक हजार २०० रुपयांची रोकड तसेच सहा लाख ४५ हजार ७५५ रुपये किमतीच्या देशी व विदेशी दारूच्या बाटल्या अवैधरित्या साठविल्याचे मिळून आले. त्यानुसार पोलिसांनी सहा लाख ४६ हजार ९५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Advertisement

यांनी केली कारवाई :- सामाजिक सुरक्षा पथकाचे सहायक निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, धैर्यशील सोळंके, पोलिस कर्मचारी विजय कांबळे, संतोष बर्गे, सुनील शिरसाट, नितीन लोंढे, भगवंता मुठे, अनिल महाजन, जालिंदर गारे, मारुती करचुंडे, राजेश कोकाटे, गणेश कारोटे, सोनाली माने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker