Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

ठाकरे सरकार विराजमान झाल्यापासून महाराष्ट्राला पनवती लागली आहे…

0 2

MHLive24 टीम, 28 जून 2021 :- ठाकरे सरकार विराजमान झाल्यापासून महाराष्ट्राला पनवती लागली आहे. कोणतेही जनहिताचे निर्णय होत नाहीत. मराठा समाजाचे आरक्षण या सरकारने घालवले त्यानंतर ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिली.

न्यायालयाला आवश्यक असलेली माहिती १५ महिन्यांमध्ये हे सरकार देऊ शकले नाही. शिवसेनेला आरक्षण द्यायचे नाही. मात्र, आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील, असे भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी आघाडी सरकारला ठणकावून सांगितले.

Advertisement

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या समर्थनार्थ कुडाळ येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांनी केले.

आंदोलनादरम्यान, निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्री मुंबईच्या बाहेर पडत नाही आणि उपमुख्यमंत्री पुण्याच्या बाहेर पडत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात काय चालले आहे, हे त्यांना माहीत नाही.

Advertisement

ओबीसी राजकीय आरक्षणामुळे भविष्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भाजप स्वस्त बसणार नाही. त्यांची भूमिका रास्त आहे. त्यामुळे भविष्यात यापेक्षाही मोठे आंदोलन भाजप करेल.

ठाकरे सरकार मधील मंत्र्यांना समाजाचे सोयरसुतक नाही. तुम्ही जगा किंवा मरा. त्यांना त्याचे काही नाही. पण आपल्या हक्कासाठी एकत्र येण्याची गरज आहे. सरकारला तुमची ताकद दाखवून देण्यावाी आवश्यकता आहे.

Advertisement

आंदोलन प्रभावी होण्यासाठी मराठा समाज, ओबीसी समाज, दलित मुस्लिम यांनी एकत्र येण्याची काळाची गरज बनलेली आहे. अन्यथा, ठाकरे सरकार अशाचप्रकारे समाजावर अन्याय करत राहील, असे माजी खासदार निलेश राणे यांनी सांगितले.

भर पावसामध्ये जी लोकं आली आहेत ती आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी आलेली आहेत. या लोकांना ठाकरे सरकारने रस्त्यावर उतरविण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे हा समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असे राणे यांनी ठणकावून सांगितले.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit