Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

राज कुंद्राच्या कृष्णकृत्यात शिल्पा शेट्टी वाटेकरी नाही

0 837

MHLive24 टीम, 23 जुलै 2021 :- पॉर्न फिल्म आणि वेब सीरीजची निर्मिती करून, ते प्रदर्शित केल्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रा याला अटक झाली आहे. त्याच्या या कृष्णकृत्याच त्याची पत्नी, बाॅलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा थेट संबंध नसल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

राज कुंद्राचा गोरज धंदा :- तरुणींना चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून, नंतर त्यांचे अश्लील व्हिडिओ काढायचे, ते ओटीटी प्लॅटफाॅर्मवर टाकायचे आणि त्यातून लाखोंची कमाई करायची, असा गोरज धंदा बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा करीत होता. त्यामुळे शिल्पाची कोंडी झाली असली, तरी या निर्मितीत तिचा प्रत्यक्ष कुठेही संबंध नाही, असे पोलिस तपासांत स्पष्ट झाले आहे.

Advertisement

शिल्पाला ‘क्लीन चिट ‘ :- पॉर्न फिल्म आणि वेब सीरीजची निर्मिती करून, ते प्रदर्शित केल्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रा याला अटक झाली आहे. त्याला २३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी हिने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

तिला या बाबतची कल्पना होती, असे सांगितले जात होते. तिचाही यात सहभाग होता, असाही आरोप केला जात होता; परंतु मुंबई पोलिसांच्या पत्रकार परिषदेनंतर शिल्पा शेट्टीया या प्रकरणात ‘क्लीन चिट ‘ मिळाली आहे.

Advertisement

अश्लील चित्रपटासाठी शोधल्या जात नवीन माॅडेल :- गेल्या सहा महिन्यांपूर्वीच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अभिनयाच्या आड चालविलेल्या जाणा-या अश्लील चित्रपटांचा काळाबाजार उघडकीस आणला होता. खोलवर तपास केल्यानंतर आता शिल्पाचा पती राज कुंद्रा याला पोलिसांनी चतुर्भुज केले. अभिनेत्री गहना वसिष्ठ हिच्याशी चित्रपटसृष्टीशी संबंधित मेकअप आर्टिस्ट, कॅमेरामन; तसेच इतर आरोपींना अटक करण्यात आली होती.

चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सेट उभारणे, अश्लील चित्रपटांसाठी नवीन मॉडेल्स शोधणे आणि ते चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करणे यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असल्याने यामागे एखादी कंपनी किंवा मोठी व्यक्ती असल्याचा पोलिसांना संशय होता. यानंतर तपास करून पुराव्यांच्या आधारावर राज कुंद्राला पोलिसांनी अटक केली आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit