मेंढीपालन:बक्कळ कमाई करून देणारा व्यवसाय; जाणून घ्या त्याविषयी सर्व सविस्तर मार्गदर्शन

MHLive24 टीम, 06 जुलै 2021 :- मेंढीपालन व्यवसाय हा शेतीला पुरक व्यवसाय म्हणून किफायतशीर आहे. पशुपालन व्यवसाय हा राज्याच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचा भाग आहे कारण राज्यातील ७० टक्के लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. मेंढीपालन व्यवसाय दुष्काळी व निमदुष्काळी भागात उत्पादन देऊन जाते.

मेंढी पालन हे कितीही प्रमाणात (जेथे जास्त जमीन नाही) किंवा एखाद्या घराच्या शेडमध्ये देखील करता येते. फार थोडी गुंतवणूक करून मेंढी पालन हा किरकोळ, लहान शेतकऱ्यांसाठी आणि भूमिहीन श्रमिकांसाठी एक फायदेशीर उद्यम ठरू शकतो.

Advertisement

आज आम्ही आपणांस मेंढीपालनाविषयी माहिती देणार आहोत. शेळीपालन करणारे काही प्रमाणात आपल्या कळपात मेंढीही पाळत असतात. धनगर समाज तर पूर्णपणे मेंढीपालन करत असतात. त्यांचा उदरनिर्वाह हा मेंढीपालनावरच असतो.

जर आपल्याला पशुपालनाची आवड असेल तर आपण मेंढीपालन करावे मेंढीपालनात बक्कळ कमाई आहे. मेंढींच्या काही जाती आहेत, त्यांची कमाई अधिक असते. या मेंढ्या मांस, लोकर आणि दुधाच्या व्यवसायासाठी फार उपयुक्त आहेत.

Advertisement

या व्यवसायाचे फायदे

 • पर्यावरण आणि अयोग्य प्रबंधन पध्दतींशी चांगले अनुकूलन
 • दिवसेंदिवस मांसाची किंमत वाढत आहे.
 • मेंढ्यांपासून दूध आणि लोकर मिळते.
 • एक मेंढी एका वेळेस 1 ते 2 करडू देते
 • मांसापासून सरासरी मिळकत 22-30 कि.ग्रा/मेंढी
 • खतामुळे जमिनीची चांगली किंमत

जाती

Advertisement
 • स्थानीय जाती: क्षेत्रांप्रमाणे बदलते
 • परकीय जाती
 • मेरीनो – लोकरीसाठी
 • रॅम बुलेट – लोकर आणि मांस
 • शेविएट – मांस
 • साउथ डाउन – मांस

महाराष्ट्रात डेक्कनी, माडग्याळ या जातीच्या मेंढ्या आढळतात. डेक्कनी मेंढी मांस उत्पादनासाठी चांगल्या असतात. सहा महिन्यानंतर मांसचा उतारा हा ४९.६+१८% तर या मेंढ्यापासून ५८७ ग्रॅम्स लोकर मिळते. माडग्याळ मेंढी या मेंढ्यांचा रंग प्रामुख्याने पांढरा त्यावर तपकिरी मोठे ठिपके आढळतात आणि हे माडग्याळ मेंढयांचे खास वैशिष्टये आहे. नर आणि मादींना शिंग येत नाहीत. या मेंढ्यांपासून लोकर आणि दूध ही कमी मिळत असते. या व्यतिरिक्त देशात आढळणाऱ्या इतर मेंढ्यांच्या जातीविषयी आपण जाणून घेणार आहोत.

गद्दी – या मेंढ्या मध्यम आकाराच्या असतात, यांचा रंग पांढरा, लाल, हलका काळा असतो. या मेंढ्यांपासून वर्षातून तीनदा आपल्याला लोकर मिळत असते. साधरण एक ते दीड किलो वजनाचे लोकर आपल्याला मिळते. या जातीच्या मेंढ्या या हिमाचल प्रदेशच्या रामनगर, उधमपूर, कुल्लू, जम्मू- काश्मीर, आणि कांगडा खोऱ्यात आणि उत्तराखंडच्या नैनीताल टेहरी गढवाल, चिमोली जिल्ह्यात आढळतात. या मेंढ्यांमधील नरांना शिंग असतात. याशिवाय १० ते १५ टक्के मादी मेंढ्यांना पण शिंग असतात.

Advertisement

मुझफ्फरनगरी – या जातीच्या मेंढ्या दिल्ली, हरियाणा, उत्तरप्रदेशाच्या मुझफ्फरनगर, बुलंदशहर, सहारनपूर, मेरठ, बिजनौर येथे आढळतात. या मेंढ्याचा रंग पांढरा असतो. याच्या शरिरावर भुरक्या रंगाचे आणि काळ्या रंगाचे ठिपके असतात.

जालौनी – या जातीच्या मेंढ्या उत्तरप्रदेशच्या जालौन, झांसी आणि ललितपूरमध्ये आढळतात. यांचा आकार मध्यम आकारच्या असतात. या जातीच्या मेंढ्यांना नर आणि मादींना शिंग असतात. याचे कान हे आकाराने मोठे आणि लांब असतात. या मेंढ्याच्या लोकरी या मऊ आणि जाड असतात. लोकर छोट्या असतात आणि मोकळे असतात.

Advertisement

पूंछीया जातीच्या मेंढ्या ह्या मुळ जम्मू प्रांतातील पुंछ आणि राजौरीतील भागात आढळतात. या मेंढ्या गद्दी जाती सारख्या असतात. परंतु यांचा आकार छोटा असतो. तर रंग पांढरा असतो, यांची शेपटी ही लहान असते.

करनाह – या जाती उत्तरी काश्मीरच्या डोंगराळ भागातील करनाह येथे आढळतात. यांचा आकार मोठा असतो. या मेंढ्यातील नराचे डोकं असते तर शिंगही असतात. या मेंढ्यांचा रंग पांढरा असतो.

Advertisement

मारवाड़ी – या जातीच्या मेंढ्या राजस्थानच्या जोधपूर, नागौर, जालौर, पाली या परिसरात आढळतात. यांचा आकार लहान असतो. चेहरा काळा रंगाचा असतो. परंतु यांच्यापासून मिळणारी लोकरही पांढऱ्या रंगाची असते. लोकर खूप दाट असल्याने वजनदार असते.

 • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
 •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement