Rakesh Jhunjhunwala’s Share : राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील ‘हा’ शेअर एकाच दिवसात 10 टक्क्यांनी वाढला; त्यात अजूनही कमाई करण्याची क्षमता आहे का? वाचा सविस्तर

MHLive24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- राकेश झुनझुनवाला यांचे नाव शेअर्सच्या जगतामध्ये कुणाला माहिती नसेल? सर्वात श्रीमंत भारतीय गुंतवणूकदार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक शेअर्स आहेत.(Rakesh Jhunjhunwala’s Share)

यातील एका शेअरने एका दिवसात १० टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. हा स्टॉक एस्कॉर्ट्स लिमिटेड या दिग्गज ट्रॅक्टर उत्पादक कंपनीचा आहे. गुरुवारी या कंपनीचा शेअर दहा टक्क्यांनी वाढून १७९३.१५ रुपयांवर पोहोचला.

५२ आठवड्यांसाठी ही त्याची सर्वोच्च किंमत होती. मात्र, नंतर तो १७६५.४० रुपयांवर बंद झाला. गुरु नानक जयंतीनिमित्त शुक्रवारी शेअर बाजार बंद राहिले. पुढील ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांचे यावर लक्ष असेल.

Advertisement

जपानी कंपनी कोबुटाच्या गुंतवणुकीने एस्कॉर्ट्सच्या शेअर्समध्ये तेजी

कंपनीच्या शेअर्समध्ये या तेजी मागील प्रमुख कारण म्हणजे बोर्डाने जपानी कंपनी कोबुटाला त्यात आपली हिस्सेदारी वाढवण्याची परवानगी दिली आहे. कोबुटा एस्कॉर्ट्स आता आपला हिस्सा 9.09 टक्क्यांवरून 14.99 टक्के करणार आहे.

BSE फाइलिंगनुसार, त्याच्या शेअर्सची संख्या 12,257,688 वरून 21,621,414 पर्यंत वाढेल. कोबुटाला 10 रुपये दर्शनी मूल्याचे 93,63,726 इक्विटी शेअर्स दिले जातील. एका शेअरची किंमत 2000 रुपये असेल.

Advertisement

संपूर्ण शेअर्सची किंमत 18,72,74,52,000 रुपये असेल. एस्कॉर्टच्या बोर्डाने प्राधान्य इश्यूद्वारे ही रक्कम वाढवण्याची परवानगी दिली आहे. या शेअर्सच्या खरेदीनंतर, कोबुटा आपला हिस्सा वाढवेल आणि ज्वाइंट प्रमोटर बनेल.

झुनझुनवाला यांची एस्कॉर्ट्समध्ये 4.8 टक्के हिस्सेदारी आहे

कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांचा एस्कॉर्टमधील हिस्सा सप्टेंबरपर्यंत 4.8 टक्के होता. त्यांच्याकडे या कंपनीचे 1,033.1 कोटी रुपयांचे 6,400,000 शेअर्स होते.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker