साडेचार रुपयांत येत होता हा शेअर; 1 लाख गुंतवले 1.21 कोटी रुपये रिटर्न मिळाले

MHLive24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- शेअर बाजार यावेळी शानदार कामगिरी करत आहे आणि यासह शेअर बाजाराने 62,000 चा आकडा पार केला आहे. दरम्यान, असे अनेक शेअर आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे.(Share Market)

मागच्या आठवड्यात बाजारात चांगली तेजी राहिली. ही तेजी सलग दुसऱ्या आठवड्यातही दिसून आली.मागच्या आठवड्यात शेअर बाजाराने नवा विक्रम नोंदवला.

असे काही स्टॉक आहेत की ज्यांनी गुंतवणूकदारांना कमी वेळेत बक्कळ कमाई करुन दिली आहे. जर तुम्हाला देखील शेअर बाजारातून कमाई करायची असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांत अगदी कवडीमोल भावात मिळणाऱ्या penny stock ने गुंतवणूकदारांना चांगली कमाई करून दिली आहे. यापैकीच एक शेअर्स म्हणजे गोपाला पॉलीप्लास्ट

गेल्या एका महिन्यात हा पेनी स्टॉक 535.10 रुपयांवरून 998.45 रुपयांवर झेपावला आहे. या कालावधीत समभागाची किंमत तब्बल 86 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या 6 महिन्यांत, हा पेनी स्टॉक 14.75 रुपयांवरून 998.45 रुपये प्रति स्टॉक पातळीपर्यंत वाढला आहे.

2021 मध्ये, हा पेनी स्टॉक 8.26 रुपयांच्या पातळीवरून वर चढून 998.45 रुपये प्रति स्टॉक पातळीवर पोहोचला. या कालावधीत, त्याने आपल्या भागधारकांना सुमारे 12,000 टक्के परतावा दिला. त्याचप्रमाणे, गेल्या एका वर्षभरात गोपाला पॉलीप्लास्टच्या शेअरची किंमत 4.45 रुपये प्रति शेअरच्या पातळीवरून 998.45 रुपये प्रति शेअर इतकी वाढली आहे.

Advertisement

जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी या पेनी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख रुपये आज 1.86 लाख रुपये झाले असते. 6 महिन्यांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्या एक लाखाचे 67.67 लाख झाले असतील.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2021 च्या सुरुवातीला 8.26 रुपयांच्या पातळीवर या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे 1 लाख रुपयांचे मूल्य आज 1.21 कोटी रुपये झाले असेल.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker