Concessions in train: ज्येष्ठ नागरिकांना आता रेल्वे भाड्यात सवलत मिळणार की नाही? नवी अपडेट समोर

MHLive24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- ज्येष्ठ नागरिकांना विविध ठिकाणी सवलती मिळत असतात. प्रवासात देखील भाड्यामधे त्यांना अर्धे तिकीट असते. तसेच रेल्वे प्रवासात देखील वर्षानुवर्षे ज्येष्ठ नागरिकांना सूट मिळत होती.(Concessions in train)

पण कोरोना संसर्गानंतर लॉकडाऊनचा हवाला देत रेल्वेने ही सूट देणे बंद केले होते. आता रेल्वेमंत्र्यांनी या भाड्यात सवलतीसंदर्भात पुन्हा एकदा नव्याने माहिती दिली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना भाड्यात सवलत मिळणार?

Advertisement

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सध्या काही श्रेणीतील लोकांना तिकीट दरात दिलेली सूट किंवा सवलत पुनर्संचयित करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व श्रेणीतील प्रवाशांसाठी दिलेली सवलत मागे घेण्यात आली आहे. आणि ते पुनर्संचयित करण्याचा अद्याप कोणताही विचार नाही.

कोरोना कालावधीत सूट मागे घेतली

कोरोना महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याआधी २० मार्च २०२० पासून रेल्वे भाड्यात दिलेली सूट पुढील आदेशापर्यंत मागे घेण्यात आली होती. तथापि, अपंग व्यक्तींच्या चार श्रेणी, रुग्ण आणि विद्यार्थ्यांच्या 11 श्रेणींमध्ये अद्याप सूट आहे.

Advertisement

ज्येष्ठ नागरिकांना किती सवलत मिळत होती?

विशेष म्हणजे भारतीय रेल्वेच्या सर्व गाड्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाच्या आधी तिकिटावर ५० टक्क्यांपर्यंत सवलत मिळत होती. रेल्वेमध्ये 60 वर्षांवरील पुरुष आणि 58 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

कोरोना कालावधीपूर्वी राजधानी, शताब्दी, दूरंतोसह सर्व मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये पुरुषांना मूळ भाड्यात 40 टक्के आणि महिलांना 50 टक्के सवलत दिली जात होती.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker