Take a fresh look at your lifestyle.

या ठिकाणच्या शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंद राहणार

0 4

Mhlive24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-  कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील शाळा तसेच कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानं दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Advertisement

त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुणे महापालिकेनं शहरातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या निर्णयाची माहिती दिली. मुंबईत दिवाळीत झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे.

Advertisement

त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतला आहे. मुंबईप्रमाणे पुणे, नाशिक व इतर जिल्ह्यांची परिस्थिती वेगवेगळी आहे.

Advertisement

नाशिक जिल्ह्यातील शाळांचे सॅनिटायझेशन पूर्ण झाल्याचे तेथील आयुक्तांनी सांगितले आहे. आता 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय त्यांनी योग्य ती खबरदारी घेऊनच घ्यायचा असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Advertisement

महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, शाळा सुरू करताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात.

Advertisement

शाळांबाबत स्थानिक जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचारविनिमय करून निर्णय घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. यामुळे सोमवारपासून शाळा नेमक्या सुरु होणार की नाहीत याबाबत राज्यात संभ्रम कायम आहे.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement

Leave A Reply

Your email address will not be published.

li