Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

SBI आणि PNB: सर्वात मोठ्या सरकारी बँका देतायेत कमाईची संधी; कसे ते जाणून घ्या

0 2

MHLive24 टीम, 28 जून 2021 :-  स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) ह्या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दोन सर्वात मोठ्या बँक आहेत. सर्वात मोठी बँक असल्याने आपण यापैकी कोणत्याही बँकेत एफडी करा किंवा बचत खात्यात पैसे ठेवा आपले पैसे या बँकांमध्ये अधिक सुरक्षित असतील.

एफडी आणि बचत खाते दोन्ही कमाईसाठी चांगले आहेत. एसबीआय आणि पीएनबी दोन्ही बँक आपल्याला हे दोन्ही पर्याय देतात. तथापि, बचत खात्यांपेक्षा एफडी अधिक लाभ देतात. आम्ही या बँकांच्या 2 वर्षाच्या एफडीबद्दल आपल्याला माहिती देऊ.

Advertisement

एसबीआय :- सध्या एसबीआयमध्ये तुम्हाला 2 वर्षांच्या एफडीवर 5.10 टक्के वार्षिक व्याज मिळेल. त्याच वेळी ज्येष्ठ नागरिकांना त्याच कालावधीसाठी अर्धा टक्के जास्त म्हणजेच 5.60 टक्के व्याज दिले जाईल. हे लक्षात ठेवा की हे दर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर लागू आहेत. आपण आपल्या जोडीदारास किंवा मुलांना एफडीचे लाभार्थी म्हणून नामनिर्देशित करू शकता.

पीएनबी :- पीएनबी देखील 2 वर्षांसाठी एफडीमध्ये गुंतवणूकीवर एसबीआय प्रमाणेच व्याज देत आहे. या बँकेत तुम्हाला दरवर्षी 5.10 टक्के व्याज मिळेल. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर अर्धा टक्का अधिक व्याज मिळेल. अशाप्रकारे, ज्येष्ठ नागरिकांना पीएनबीमधील एफडीवर 5.60 टक्के व्याज मिळेल. हे व्याज दर दोन कोटींपेक्षा कमी रकमेवर लागू होतील.

Advertisement

एचडीएफसी बँकेचा व्याजदर जाणून घ्या :- एसबीआय आणि पीएनबी नंतर खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेचे व्याज दर देखील जाणून घ्या. ही बँक 2 वर्षांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना वर्षाकाठी 4.90 टक्के व्याज दर देत आहे.

दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांना एचडीएफसी बँकेत अर्धा टक्के अधिक व्याज मिळेल. अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना 5.40टक्के व्याज दिले जाईल. हे लक्षात ठेवा की हा व्याज दर 2 कोटींपेक्षा कमी रकमेवर लागू आहे.

Advertisement

आयसीआयसीआय बँक :- आयसीआयसीआय बँकेबद्दल पहिले तर ही बँक 2 वर्षांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 5% वार्षिक व्याज दर देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांनाही या बँकेमध्ये अर्धा टक्के अधिक व्याज मिळेल. अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना 5.50 टक्के व्याज दिले जाईल. हे लक्षात ठेवा की हा व्याज दर 2 कोटींपेक्षा कमी रकमेवर देखील लागू आहे.

टॅक्ससेविंग एफडी :- सध्या सर्वसाधारण नागरिकांना येस बँकेत 5 वर्षांच्या कर बचत एफडीवर 6.50 टक्के आणि 7.25 टक्के व्याज मिळत आहे. त्याचबरोबर डीसीबी बँकेत हे व्याजदर 6.50 टक्के आणि 7.00 टक्के, आरबीएल बँकेत 6.50 टक्के आणि 7.00 टक्के, इंडसइंड बँकेत 6.00 टक्के आणि 6.50टक्के करूर वैश्य बँकेत 6.00 टक्के आणि 6.00 टक्के आहेत. हे व्याज दर युनियन बँकेत 5.55 टक्के व 6.05 टक्के, कॅनरा बँकेत 5.50 टक्के आणि 6.00 टक्के आहेत.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement