Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

साॅरी माॅम म्हणत तरुण पोलिसाने संपविले जीवन

0 0

MHLive24 टीम, 22 जून 2021 :- सामान्य नागरिकांप्रमाणेच आता पोलिसांतही आत्महत्या वाढायला लागल्या आहेत. कामाचा नसलेले तास, अतिरिक्त ताण आणि नैराश्य यामुळे तरुण पोलिसही आपले जीवन संपवित आहेत.

सुसाईड नोटमध्ये कारणाचा उल्लेखच नाही

Advertisement

पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका शिपायाने आत्महत्या केली. रज्जाक मोहम्मद मणेरी असे या पोलिसाचे नाव आहे. रज्जाक यांच्या मृतदेहाजवळ “सॉरी मॉम” असे लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. त्यात आत्महत्या कारणाचा उलगडा झालेला नाही. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

पोलिस इंदापूरचा

Advertisement

रज्जाक हा इंदापूर तालुक्यातील मणेरी येथील रहिवाशी होता; पण गेल्या काही वर्षांपासून तो पुण्याच्या भोर तालुक्यातील राजगड पोलिस ठाण्यात कार्यरत होता. रज्जाकचे नातेवाइक गेल्या दोन दिवसांपासून त्याला काही कामानिमित्त फोन करत होते; मात्र तो फोन उचलत नसल्याने त्याच्या नातेवाइकांनी थेट तो राहत असलेले ठिकाण गाठले. पुण्यातील किकवी या गावी रज्जाक राहत होता. त्या ठिकाणी आल्यानंतर नातेवाईकांना रज्जाक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

आत्महत्येपूर्वी नसही घेतली कापून

Advertisement

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. रज्जाकने गळफास घेण्यापूर्वी नसही कापून घेतली होती. त्यानंतर त्याने गळफास घेत जीवनप्रवास संपवला.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement