Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

भन्नाट ! Hyundai आणत आहे ‘छोटू’ एसयूव्ही; बजेटमध्येही फिट

0 30

MHLive24 टीम, 10 जुलै 2021 :-  दक्षिण कोरियाची आघाडीची कार निर्माता कंपनी ह्युंदाई मागील काही काळात एसयूव्ही विभागात खूप गुंतवणूक करत होती. कंपनी एसयूव्ही विभागात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे.

आता कंपनी एक छोटी एसयूव्ही बाजारात आणण्याची तयारी करत आहे. या कारचे नाव अद्याप समोर आले नाही परंतु यास Hyundai AX1 हे कोडनेम दिले आहे.

Advertisement

टीझरमध्ये दिसला कारचा फर्स्ट लुक :- काही काळापूर्वी कंपनीने या कारचे टीझर प्रसिद्ध केले. या टीझरमध्ये कारचे हेडलॅम्प आणि टेललॅम्प दिसत होते. आता या कारच्या नवीनस्पाई इमेज समोर आल्या आहेत ज्यात कारचे जवळजवळ प्रॉडक्शन रेडी मॉडेल दिसत आहे.

ही मिनी एसयूव्ही ब्रँडच्या सिग्नेचर एसयूव्ही डिझाईनसह येणार आहे. कारच्या पुढील भागात प्रोजेक्टर हेडलॅम्प देण्यात आले आहेत. कारच्या बम्परच्या तळाशी LED DRLs इंटिग्रेट करण्यात आल्या आहेत. एलईडी टेल लॅम्पमध्ये ट्राइएंगुलर नमुना वापरला गेला आहे. टर्नअराऊंड इंडिकेटर एका गोल दिव्यासारखे डिझाइन केले आहे.

Advertisement

ऑटो एक्सपोमध्ये सादर केलेला एचबीएक्स मॉडेल 90% प्रॉडक्शन-रेडी (फाइनल मॉडल) होते. याचा अर्थ, विस्तीर्ण टायर्स, रूफ-रॅक आणि इतर काही भाग वगळता, अंतिम मॉडेल (लाँच केले जाणे) ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित केलेल्या मॉडेलसारखेच असेल. कंपनीच्या नव्या अल्फा मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर आधारीत अल्टरोज नंतर टाटाची ही छोटी एसयूव्ही दुसरी मॉडेल आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement