Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

रोनाल्डो ! केवळ एक प्लेयर नाही, आहे मोठा बिझनेसमन; त्याची कमाई पाहून आणि कमाईचे मार्ग पाहून डोळे होतील पांढरे

0 3

MHLive24 टीम, 24 जून 2021 :-  जवळजवळ प्रत्येक क्रीडाप्रेमी हा पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डोला ओळखतोच. त्याने आपल्या कौशल्याचा आणि परिश्रमांच्या जोरावर फुटबॉलवर राज्य केले आहे. रोनाल्डो एक फुटबॉलपटू आहे तसा तो एक व्यावसायिक माणूस देखील आहे.

त्याच्या फुटबॉल प्रवासाविषयी चाहत्यांना माहिती आहेच, परंतु त्याच्या व्यवसाय प्रवासाबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. फुटबॉलव्यतिरिक्त रोनाल्डो सोशल मीडियावरुन पैसेही कमावतो. एवढेच नाही तर त्याच्याकडे हॉटेल, जिमची चेन देखील आहे. याशिवाय ते एका टेक कंपनीचे मालकही आहेत.

Advertisement

जाणून घेऊयात रोनाल्डोचे काय काय व्यवसाय आहेत ? :- रोनाल्डो ही संपूर्ण जगातील एकमेव प्रसिद्ध व्यक्ती आहे, ज्यांचे इन्स्टाग्रामवर 303 मिलियन हून जास्त फॉलोअर्स आहेत. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार रोनाल्डो त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकण्यासाठी एक मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 7.50 कोटी रुपये घेतो.

रोनाल्डोने इन्स्टाग्राम पोस्टवरून एका वर्षात 47.8 मिलियन डॉलर (सुमारे 340 कोटी रुपये) कमावले. एवढेच नव्हे तर जगातील अव्वल श्रीमंत सेलिब्रिटींच्या यादीतही रोनाल्डोचा समावेश आहे.

Advertisement

रोनाल्डोची एकूण संपत्ती 460 मिलियन डॉलर्स (सुमारे 3400 कोटी रुपये) आहे. रोनाल्डो बर्‍याच ब्रँडची जाहिरात करतो. त्यामध्ये हर्बालाइफ न्यूट्रिशन, क्लियर हेअर केअर ब्रँड, अमेरिकन टूरिस्टर, पॅन्झर ग्लासेस, इम्पीरिओ अरमानी, स्पोर्ट्सलॉब्सटर, एमिरेट्स एअरलाईनचा समावेश आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, या जाहिरातींच्या शूटिंगसाठी रोनाल्डो 8 ते 10 कोटी रुपये घेतो.

रिपोर्ट्सनुसार, रोनाल्डो ला दरवर्षी युवेंटस कडून खेळण्यासाठी 60 मिलियन डॉलर (सुमारे 450 कोटी रुपये) मिळतात. रोनाल्डोने नाइकी (Nike)बरोबर एक बिलियन डॉलर (सुमारे 7500 कोटी रुपये) चा करारही केला आहे. रोनाल्डो हा क्रीडा उद्योगातील एकमेव खेळाडू आहे ज्याने वैयक्तिक पातळीवर इतका मोठा करार केला आहे.

Advertisement

रोनाल्डोने अ‍ॅडम परफ्यूम्सच्या सहकार्याने क्रिस्टियानो लेगसी नावाच्या परफ्यूमची स्वतःची रेंज देखील सुरू केली आहे. फुटबॉल चाहत्यांना हे माहित असलेच पाहिजे की रोनाल्डोने त्याच्या तंदुरुस्तीकडे बरेच लक्ष दिले आहे. फिटनेस बद्दलचे हे प्रेम, त्याने 2016 मध्ये एका व्यवसायात बदलले. रोनाल्डोने अमेरिकेतील हेल्थ क्लब क्रंचच्या सहकार्याने सीआर 7 जिमची चैन लॉन्च केली.

पोर्तुगालच्या सर्वात मोठ्या हॉटेल ग्रुप च्या सहकार्याने रोनाल्डोने सीआर 7 नावाची लक्झरीयस हॉटेल चेन सुरू केली आहे. यासाठी त्याने 60 मिलियन युरो (सुमारे 530 कोटी रुपये) गुंतविले आहेत. वृत्तानुसार, 2021 मध्ये पॅरिसमध्ये या हॉटेल चेनची शाखा देखील सुरू होणार आहे.

Advertisement

टेक्नॉलजीच्या या युगात रोनाल्डो या क्षेत्रात कसा मागे राहिल? त्याने 2017 मध्ये 7EGEND नावाची टेक्नॉलजी कंपनी सुरू केली. ही कंपनी डिजिटल सोल्यूशन्सवर काम करते. येत्या काही काळात एक्सपोर्ट इंडस्ट्रीला त्याच्या कंपनीकडून बराच फायदा मिळू शकतो.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement