Relatives of those who died due to corona will get Rs 50,000 : कोरोनामुळे मृत्यू झालेल्याच्या नातेवाईकांना मिळणार ५० हजार रुपयांची मदत ! जाणून घ्या काय असेल प्रक्रिया ?

MHLive24 टीम, 23 सप्टेंबर 2021 :- कोरोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची सानुग्रह रक्कम देण्यात येईल. केंद्र सरकारने सुप्रीम काेर्टात बुधवारी ही माहिती दिली.(Relatives of those who died due to corona will get Rs 50,000)

यापूर्वी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसाठीच नव्हे, तर भविष्यात या महामारीमुळे ज्यांचा कुणाचा मृत्यू होईल, त्यांच्या नातेवाइकांना ही रक्कम भरपाई म्हणून दिली जाणार असल्याचेही केंद्राने स्पष्ट केले.

राज्य सरकारच्या आपत्ती निवारणार्थ राखीव निधीतून ही रक्कम संबंधितांना दिली जाणार आहे. दरम्यान, सुप्रीम काेर्टाच्या निर्देशांनुसार एनडीएमएने अशा भरपाईबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत.

Advertisement

कोरोनाचा देशात संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३.९८ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या सर्वांच्या नातेवाइकांना ही ५० हजारांची रक्कम दिली जाणार आहे.

रक्कम मिळविण्यासाठी काय असेल प्रक्रिया ?

मदतीची रक्कम मिळविण्यासाठी मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी छापील अर्ज किंवा हॉस्पिटलच्या प्रमाणपत्रासह जिल्हा आपत्ती निवारण निधी अधिकारी किंवा त्यांच्या कार्लालयात अर्ज सादर करावा लागेल.

Advertisement

या अर्जावर संबंधित यंत्रणेला 30 दिवसांत निर्णय घ्यावा लागेल
मदत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल
अर्जावर निर्णय घेण्यासाठी जिल्हा पातळीवर समिती असणार
समितीला जर अर्ज फेटाळायचा असेल तर त्याचे लेखी कारण देणं बंधनकारक

काय होते आदेश ?

कोरोनामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाइकांना यासंबंधीची भरपाई देण्याचे आदेश सुप्रीम काेर्टाने ३० जून रोजी दिले होते. शिवाय, ही भरपाई किती असावी यासंबंधी निर्णय घेऊन तसे निर्देश राज्य सरकारांना देण्यात यावेत, असेही काेर्टाने स्पष्ट केले होते.

Advertisement

हे तर सरकारचे कर्तव्यच

सुनावणीदरम्यान सुप्रीम काेर्टाने महामारीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना भरपाई म्हणून ठराविक रक्कम देणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे म्हटले होते. मात्र, ही रक्कम किती असावी, हे ठरवण्याचे अधिकार सरकारला दिले होते.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker