Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

फास्टॅगच्या डेली कलेक्शनने केले रेकॉर्ड; एकाच दिवसात तब्बल ‘इतक्या’ कोटींची कमाई

0 0

MHLive24 टीम, 04 जुलै 2021 :- अनेक राज्यांत लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर महामार्गांवरील वाहतुकीत वाढ झाल्याने फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुली कोविडच्या दुसर्‍या लहरीपूर्वी नोंदवलेल्या पातळीवर पोहोचली आहे.

1 जुलै 2021 रोजी 63.09 लाख रुपयांच्या व्यवहारासह, फास्टॅगमार्फत टोल कलेक्शन देशभरात 103.54 कोटी रुपयांवर गेली आहे. फास्टॅगच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन देशभरात 780 सक्रिय टोल प्लाझावर चालविले जात आहे.

Advertisement

जून 2021 मध्ये टोल वसुली 2,576.28 कोटी रुपये झाली, जी मे 2021 मध्ये गोळा झालेल्या 2,125.16कोटींपेक्षा 21 टक्क्यांनी जास्त आहे. सुमारे 3.48 करोड़ यूजर्स सह, FASTag देशभरात 96 टक्के आणि बर्‍याच टोल प्लाझावर 99 टक्के पर्यंत वापरला जात आहे.

एका अंदाजानुसार, FASTag मुळे वर्षाकाठी सुमारे 20,000 कोटी रुपयांची इंधनाची बचत होईल, यामुळे मौल्यवान परकीय चलनाची बचत होईल आणि पर्यावरणाला मदत होईल.

Advertisement

आता केंद्र सरकारने टोल प्लाझावर आणखीन काही नवीन नियम लागू केले आहेत. नव्या नियमानुसार प्रत्येक टोल प्लाझावर वाहनाद्वारे टोल भरण्याची वेळ बदलण्यात आली असून, ही वेळ 10 सेकंद करण्यात आली आहे.

टोल प्लाझावर कोणत्याही वाहनाला 100 मीटरपेक्षा जास्त लांब लाईन असेल तर अशा वाहनांकडून टोल टॅक्स आकारला जाणार नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एनएचएआयने बुधवारी हे नवीन नियम जाहीर केले की, जॅम 100 मीटरपर्यंत असेल तर कोणत्याही वाहनावर टोल कर आकारला जाणार नाही.

Advertisement

हा जॅम 100 मीटरच्या खाली येईपर्यंत टॅक्स आकारला जाणार नाही. हा नवीन नियम लागू करण्यासाठी प्रत्येक टोल प्लाझावर टोल लाईनमध्ये 100 मीटरच्या अंतरावर पिवळ्या रेषा ओढल्या जातील.

त्यानंतर टोल प्लाझावर वाहनांच्या रांगा लागल्या असता ज्या 100 मीटरपर्यंत पोहोचतात, त्या वाहनांवर कर आकारला जाणार नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे की, बहुतेक टोल प्लाझाला फास्टॅग अनिवार्य असल्याने 100 मीटर लांबीच्या लाईन लागत नाही.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement