Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

पेट्रोल-डिझेलच्या टॅक्समधून मोदी सरकारने केली आतापर्यंतची रेकॉर्डब्रेक कमाई; पहा आकडेवारी

0 0

MHLive24 टीम, 25 जून 2021 :-  सध्या पेट्रोल-डिझेलचे दर रोज थोडेथोडे वाढत आहेत. आज एक लिटर पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. याचा भार सर्वसामान्यांच्या खिशावर पडला आहे. यामुळे महागाई देखील वाढत चालली आहे. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या नाकी-नऊ आले आहेत.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सरकार पेट्रोल आणि डिझेलवर बरेच कर लावते. त्यामुळे या किमती भरमसाठ वाढत असतात. सद्य स्थितीला जे कर इंधनावर लागू आहेत त्यामधून जबरदस्त टॅक्स मोदी सरकारला मिळाला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच सरकारला प्राप्तिकरातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न पेट्रोल, डिझेलवरील करांतून मिळालं आहे.

Advertisement

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जर आपण पहिले तर पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीतून सरकारनं तब्बल ५.२५ लाख कोटी रुपये कमावले आहेत. याच कालावधीत प्राप्तिकराच्या माध्यमातून सरकारला ४.६९ लाख कोटी रुपये मिळाले. कंपन्यांनी भरलेल्या कॉर्पोरेट करांतून सरकारला ४.५७ लाख कोटी रुपये मिळाले आहेत.

म्हणजेच इंधन करामधून जबरदस्त कमाई सरकारला झाली आहे. पेट्रोल, डिझेलवर सरकारकडून प्रचंड कर आकारला जातो. यात उत्पादन शुल्क, मूल्यवर्धित कर यांच्यासह आणखी अर्धा डझन लहान करांचा, शुल्कांचा आणि सेसचा समावेश होतो. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीतून सरकारला ५.२५ लाख कोटी रुपये मिळाले.

Advertisement

यामध्ये केंद्र सरकारकडून घेतला जाणारा अबकारी कर आणि राज्यांचं मूल्यवर्धित कर यांचा समावेश आहे. मूल्यवर्धित करांचा आकडा केवळ डिसेंबरपर्यंतचा आहे.

मूल्यवर्धित करांच्या माध्यमातून मार्च तिमाहीत राज्यांना मिळालेल्या उत्पन्नाचा यात समावेश नाही. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारला इंधनावरील करांमधून सरकारला सर्वाधिक रक्कम मिळाली आहे.

Advertisement

असे ठरवतात पेट्रोल-डिझेलची किंमत :- परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. याच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात.

पेट्रोलमध्ये किती आहे टॅक्स ? :- आपण पेट्रोल आणि डिझेलसाठी जी किहीम मोजता त्यापैकी पेट्रोलसाठी 55.5 टक्के आणि डिझेलसाठी 47.3 टक्के टॅक्स भरत आहात.

Advertisement

विक्रेतेही त्यांचे मार्जिन जोडतात :- डीलर्स म्हणजे पेट्रोल पंप चालवतात ते लोक. ते कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर ग्राहकांना त्या दराने पेट्रोल स्वत: विकतात. पेट्रोल दर आणि डिझेल दरामध्येही ही किंमत जोडली जाते.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement