Good news for jio users: जिओ यूजर्ससाठी खुशखबर! ‘ह्या’ प्लॅन्सने रिचार्ज करा अन 20% कॅशबॅक मिळवा

MHLive24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- मागील काही दिवसांत अनेक टेलिकॉम कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लॅन वाढवले आहेत. यात रिलायन्स जिओ देखील मागे नाही. जिओने गेल्या काही दिवसांत आपल्या यूजर्सना अनेक धक्के दिले आहेत. कंपनीने आधी आपल्या प्रीपेड प्लॅनची किंमत वाढवली आणि नंतर Jio फोन प्लॅनची किंमत वाढवली.(Good news for jio users)

आता Jio ने युजर्ससाठी नवीन घोषणा केली आहे. त्यामुळे युजर्सना एक खुशखबर मिळणार आहे. अन काहीसा दिलासा मिळणार आहे. Jio च्या काही प्रीपेड प्लॅनवर JioMart साठी 20% कॅशबॅक दिला जात आहे. या योजना कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

जिओचा 299 रुपयांचा प्लॅन

Advertisement

Jio च्या या प्रीपेड प्लॅनची किंमत 299 रुपये आहे आणि त्याची वैधता 28 दिवस आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2GB इंटरनेट, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. तसेच, यामध्ये तुम्हाला सर्व जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. हा प्लान घेतल्यावर तुम्हाला Jio कडून JioMart वर 20% कॅशबॅक मिळत आहे.

जिओचा 666 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

666 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी दररोज 1.5GB डेटा, दररोज 100 SMS आणि कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सुविधा मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला सर्व जिओ अॅप्समध्ये ऍक्सेस मिळेल. हा प्लान घेतल्यावर तुम्हाला Jio कडून JioMart वर 20% कॅशबॅक मिळत आहे.

Advertisement

जिओचा 719 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या प्लॅनमध्ये, तुम्हाला दररोज 2GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 SMS तसेच Jio Cloud आणि Jio Cinema सारख्या सर्व Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शनचे फायदे मिळतील.

या प्लॅनची किंमत 719 रुपये आहे आणि त्याची वैधता 84 दिवस आहे. ज्या 20% कॅशबॅकबद्दल बोलले जात आहे ते Jiomart वर पॉइंट्सच्या स्वरूपात दिले जाईल आणि हे पॉइंट्स त्या प्लॅटफॉर्मवर काहीही खरेदी करताना वापरले जाऊ शकतात.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker