Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

‘ह्या’ मोठ्या बँकेसह दोन बँकांवर RBI ची मोठी कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने…

0 6

MHLive24 टीम, 04 जुलै 2021 :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सायबर सिक्युरिटीशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पंजाब आणि सिंध बँकेला 25 लाखांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्यानुसार, बँकेने सायबर सुरक्षांच्या निकषांचे पालन केले नाही.

या सरकारी मालकीच्या बँकेला 16 मे आणि 20 मे 2020 रोजी काही सायबर घटनांबद्दल माहिती देण्यात आली होती, परंतु त्याकडे बँकेने दुर्लक्ष केलं. त्यामुळे आरबीआयने ही दंडात्मक कारवाई केली. याशिवाय, रिझर्व्ह बँकेने इटावा येथील नगर सहकारी बँकेवरही दंडात्मक कारवाई केली. या बँकेला 1 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या बँकेनेही नियमांची पायमल्ली केल्याच ठपका रिझर्व्ह बँकेकडून ठेवण्यात आला आहे.

Advertisement

PMC बॅंकेवरील निर्बंधात वाढ :- आरबीआयने शुक्रवारी पीएमसी बँकेच्या निर्बंधात 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढ केली आहे. हे निर्बंध आधी 1 जुलैपर्यंत होते. आरबीआयने सांगितलं की पीएमसी बँकेच्या पुनर्रचना पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन हे निर्बंध वाढवण्यात आले आहेत.

सारस्वत आणि एसव्हीसी सहकारी बँकेवर कारवाई :- भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील चार बड्या सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये मुंबईतील सारस्वत सहकारी बँक आणि एसव्हीसी सहकारी बँकेचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने या दोन्ही बँकांना अनुक्रमे 25 लाख आणि 37.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

Advertisement

तर उर्वरित दोन बँकांमध्ये आंध्र प्रदेशातील महेश को-ऑपरेटिव अर्बन बँक आणि अहमदाबादच्या मर्केंटाइल को-ऑपरेटिव बँकेचा समावेश आहे. यापैकी महेश को-ऑपरेटिव अर्बन बँकेला 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर मर्केंटाइल सहकारी बँकेला 62.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement