Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

आरबीआयने महाराष्ट्रातील ‘ह्या’ नामांकित तीन सहकारी बँकांवर केली कारवाई; लाखोंचा दंड

0 9

MHLive24 टीम, 22 जून 2021 :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) तीन सहकारी बँकांवर एकूण 23 लाखांचा दंड ठोठावला आहे. काही नियमांचे पालन करण्यात हलगर्जीपणामुळे या तिन्ही बँकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. मोगावीरा सहकारी बँक लिमिटेड, इंदापूर अर्बन कोऑपरेटिव बँक आणि बारामती सहकारी बँक लि. अशी बँकांची नावे आहेत. या तिन्ही बँका महाराष्ट्रातील आहेत. 

मुंबईच्या मोगावीरा सहकारी बँकेला दंड

Advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईच्या मोगावीरा सहकारी बँक लि. वर 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकेच्या तपासणी अहवालात काही चुका उघड झाल्यामुळे हा दंड आकारण्यात आला आहे. आरबीआयचे म्हणणे आहे की तपासणी अहवालातून असे दिसून आले आहे की या सहकारी बँकेने 31 मार्च 2019 पर्यंत बिना क्लेम वाली जमा रक्कम डिपॉजिटर एजुकेशन एंड अवायरनेस (DEA) फंड मध्ये पूर्णतः ट्रांसफर केली नव्हती.

तसेच, त्यांनी नॉन-ऑपरेटिंग खात्यांचा वार्षिक आढावा घेतला नव्हता, जो नियमांनुसार करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त या बँकांनी वेळोवेळी खात्यांच्या जोखमीच्या श्रेणीचा आढावा घेण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती.

Advertisement

पुण्याच्या इंदापूर नागरी सहकारी बँकेवर कारवाई

रिझर्व्ह बँकेने पुणे, इंदापूर अर्बन कोऑपरेटिव बँक, महाराष्ट्र ला दहा लाखांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, या बँकेच्या तपासणी अहवालात असे दिसून आले आहे की 31 मार्च 2019 पर्यंत अनसिक्योर्ड एडवांस ची एकूण मर्यादा पाळली गेली नव्हती.

Advertisement

इतकेच नाही तर वेळोवेळी सर्व खात्यांच्या जोखमीच्या श्रेणीचा आढावा घेण्यासाठीही बँकेने कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती कि ज्याद्वारे ग्राहक आपल्या रिस्क कैटेगरीशी न जुळणारे व्यवहार करतात तेव्हा अलर्ट जेनरेट करण्यासाठी अशी व्यवस्था नव्हती.

बारामती सहकारी बँकेला दंड

Advertisement

रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील बारामती येथे असलेल्या बारामती सहकारी बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कारण कोणत्याही एका बँकेत झालेल्या व्यवहारासंदर्भात त्यांनी प्रुडेन्शियल आंतर-बँक एक्सपोजर मर्यादेचे उल्लंघन केले आहे. आरबीआयने हे देखील स्पष्ट केले आहे की या तिन्ही प्रकरणांमध्ये नियामक पालन नसल्यामुळे अर्थात नियमांचे पालन न केल्यामुळे बँकांवर दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या बँकाद्वारे ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराची किंवा कराराची वैधता यावर टिप्पणी किंवा निर्णय म्हणून ही कारवाई मानली जाऊ नये.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement