Big News: क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताय का? RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी त्याबाबत केलंय मोठे भाकीत; वाचा…

MHLive24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :- भारतासह अनेक देशांमध्ये क्रिप्टोकरन्सी अचानक लोकप्रिय झाली आहे. बिटकॉईन सारख्या क्रिप्टोकरन्सी मध्ये मोठ्या प्रमाणात लोक गुंतवणूक करत आहेत. त्याचप्रमाणे नवं-नवीन क्रिप्टोकरन्सी अधिक लोकप्रिय होत आहेत.(Big News)

क्रिप्टोकरन्सी अत्यंत अस्थिर असण्यासोबतच मजबूत परतावा देण्यासाठी देखील ओळखल्या जातात. परंतु आता भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी क्रिप्टोकरन्सी बाबत मोठा दावा केला आहे.

या दाव्यानुसार चिट फंडांसारखेच अगदी क्रिप्टोकरन्सीचा देखील फुगा लवकरच फुटेल आणि त्यातील बहुतेकांचे अस्तित्व संपुष्टात येईल. सध्या जगात 6,000 क्रिप्टोकरन्सी आहेत आणि राजन म्हणतात की यापैकी फक्त 1 किंवा दोनच राहतील.

Advertisement

राजन यांनी एका मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की बहुतेक क्रिप्टो अस्तित्वात आहेत कारण काही मूर्खांना ते विकत घ्यायचे आहेत. ते म्हणाले की, चिट फंडांमुळे देशात जशी समस्या निर्माण झाली आहे तशीच समस्या क्रिप्टोकरन्सीमुळे निर्माण होईल. चिट फंड लोकांकडून पैसे घेतात आणि नंतर गायब होतात. क्रिप्टो मालमत्ता बाळगणाऱ्या अनेकांना येत्या काही दिवसांत अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

ब्लॉकचेन टेक्नोलॉजी

राजन म्हणाले की बहुतेक क्रिप्टोचे कोणतेही कायमस्वरूपी मूल्य नसते, परंतु काही क्रिप्टो पेमेंटसाठी, विशेषत: क्रॉस-बॉर्डर पेमेंटसाठी अस्तित्वात असू शकतात. ब्लॉकचेन तंत्रज्ञान राखण्याबाबत राजन म्हणाले की, केंद्र सरकारने ते देशात पुढे नेण्याची परवानगी दिली पाहिजे. सरकारने म्हटले आहे की ब्लॉकचेन तंत्रज्ञानाला परवानगी दिली जाऊ शकते.

Advertisement

बिटकॉइन सारख्या खाजगी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्यासाठी सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्याचा विचार करत आहे. यामुळे देशातील अधिकृत डिजिटल चलनाचा मार्गही मोकळा होईल.

आरबीआय ते जारी करेल. RBI ने सरकारला खाजगी क्रिप्टोकरन्सीच्या धोक्यांबाबत इशारा दिला आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी क्रिप्टोकरन्सीला मॅक्रो इकॉनॉमिक आणि आर्थिक स्थिरतेसाठी धोका असल्याचे म्हटले आहे.

किती लोकांकडे क्रिप्टोकरन्सी आहे

Advertisement

भारतासह जगभरात अलीकडच्या काळात क्रिप्टोकरन्सीची क्रेझ झपाट्याने वाढली आहे. उद्योगातील सूत्रांनुसार, भारतात 10 करोड़हून अधिक लोकांकडे क्रिप्टोकरन्सी आहेत. यामध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. भारतात क्रिप्टो मालकांची संख्या अमेरिकेपेक्षा जास्त आहे. तथापि, होल्डिंगच्या मूल्याच्या बाबतीत अमेरिका पुढे आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker