RBI action against this bank : ‘ह्या’ बँकेवर रिझर्व्ह बँकेची कारवाई; फक्त 1000 रुपयेच काढता येणार; यात तुमचं खातं आहे का? वाचा…

MHLive24 टीम, 13 नोव्हेंबर 2021 :- भारतीय रिझर्व्ह बँकेने मागील काही दिवसांमध्ये अनेक बँकांवर कारवाई केलेल्या आहेत. आता याच पार्श्वभूमीवर आणखी एका बँकेवर कारवाई करण्यात आलेली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या सोलापूरमधील लक्ष्मी सहकारी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत.(RBI action against this bank )

त्यानुसार या बँकेच्या खातेदारांना केवळ 1 हजार रुपयांपर्यंत पैसे काढता येणार आहेत. आरबीआयच्या या कारवाईमुळे बँकेत ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. त्यामुळे खातेदार आणि ठेवीदार हवालदिल झाले आहेत.

रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, बँकिंग नियमन कायदा, 1949 अंतर्गत लादलेले निर्बंध 12 नोव्हेंबर 2021 रोजी कामकाजाचे तास बंद झाल्यानंतर सहा महिने लागू राहतील. यादरम्यान निर्बंधांचा आढावा घेतला जाईल.

Advertisement

रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार, लक्ष्मी सहकारी बँक मध्यवर्ती बँकेच्या परवानगीशिवाय कोणतेही कर्ज देऊ शकणार नाही किंवा कर्जाचे नूतनीकरण करू शकणार नाही. तसेच, बँक कोणतीही गुंतवणूक करणार नाही किंवा कोणतेही पैसे देणार नाही किंवा पेमेंट करण्यास संमती देणार नाही.

रिझव्‍‌र्ह बँकेने पुढे म्हटले आहे की, आरबीआयने दिलेल्या निर्देशांना बँकिंग परवाना रद्द करणे असे मानले जाऊ नये. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय करत राहील. आरबीआयने म्हटले आहे की ज्या ग्राहकांच्या खात्यातून कर्जाचा हप्ता कापला जातो, त्यांना अटींनुसार सेटलमेंटची परवानगी दिली जाऊ शकते.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker