Ratan Tata
Ratan Tata

MHLive24 टीम, 06 मार्च 2022 :- Ratan Tata : भारतात उद्योग तसेच सामाजिक दायित्व जपणारे सर्वात मोठे नाव हे रतन टाटांचे आहे. उद्योगपती रतन टाटा हे आपल्या सामाजिक कार्यामुळे कायम चर्चेत राहतात. असे असतानाच आता त्यांचे सहाय्यक शंतनू नायडू हे देखील चर्चेत आले आहेत.

कॉर्नेल युनिव्हर्सिटीमधून भारतात परतल्यानंतर शंतनूने असे स्थान मिळवले की जिथे पोहोचण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असेल. शंतनू नायडू यांनी आता एका मुलाखतीत त्यांचा रतन टाटांबाबत एक अनुभव शेअर केला आहे.

प्राण्यांसाठी संवेदनशीलता

नायडू म्हणाले की रतन टाटा यांना त्यांची मोटोपॉव्सची कल्पना खूप आवडली. शंतनू नायडू यांची कंपनी मोटोपॉव्स भटक्या कुत्र्यांना मदत करण्यासाठी परावर्तित कॉलर बनवते.

‘रतन टाटा निस्वार्थपणे मदत करतात’

शंतनू नायडू म्हणाले की, रतन टाटा यांचे दयाळू आणि निस्वार्थी कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. लोकांना मदत केल्याच्या बदल्यात त्यांच्याकडून काही परत मिळेल अशी त्यांची अपेक्षा नसते. नायडू म्हणतात की, दिवसभर अनेकांना मदत केल्यानंतर टाटा हे विसरतात.

‘रतन टाटा नेहमीच दिलेले वचन पाळतात’

शंतनू नायडू यांनी संभाषणात सांगितले की, रतन टाटा नेहमीच त्यांची आश्वासने पाळतात. नायडू म्हणतात की तो त्याच्या बॉसकडून रोज काहीतरी शिकतो. शंतनू नायडू यांनी ‘आय केम अपॉन अ लाइटहाऊस’ हे पुस्तकही लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी रतन टाटा यांच्यासोबतचे अनुभव सांगितले आहेत.

2018 पासून उपमहाव्यवस्थापक आहेत

शंतनू नायडू हे रतन टाटा यांच्या कार्यालयात 2018 पासून उपमहाव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. एवढ्या लहान वयात या उंचीला स्पर्श करणे तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. शंतनू नायडू फक्त 28 वर्षांचे आहेत.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup