Rakesh JhunJhunwala Portfolio
Rakesh JhunJhunwala Portfolio

MHLive24 टीम, 20 मार्च 2022 :- Rakesh JhunJhunwala Portfolio : बरेच भारतीय राकेश झुनझुनवाला कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात हे जाणून घेण्यासाठी उत्सूक असतात. झुनझुनवाला आपल्या स्टेक मुळे कायम चर्चेत असतात. त्यांनी कोणत्या कंपनीत गुंतवणूक केली आहे किंवा स्टेक कमी केला यावर बराचवेळा मार्केट फिरते.

दरम्यान राकेश झुनझुनवाला यांच्या मालमत्तेत केवळ दोन शेअर्समुळे 861 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

चला जाणून घेऊया असे कोणते स्टॉक आहेत ज्यांमुळे राकेश झुनझुनवालाचे उत्पन्न वाढले आहे?

होळीच्या एक दिवस आधी 17 मार्च रोजी टायटन कंपनीच्या एका शेअरची किंमत 2587.30 रुपयांवरून 2706 रुपये प्रति शेअर झाली. म्हणजेच प्रति शेअर सुमारे 118.70 रुपयांची उसळी दिसून आली. त्याचप्रमाणे स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या एका शेअरची किंमत 608.80 रुपयांवरून 641 रुपये प्रति शेअर झाली आहे. या कंपनीत प्रति शेअर 32.20 रुपयांची उसळी दिसून आली आहे.

जाणून घेऊया या दोन कंपन्यांमध्ये ‘बिग बुल’ची किती हिस्सेदारी आहे?

टायटनच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 पर्यंत, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 3,57,10,395 शेअर्स आहेत. म्हणजेच त्यांचा वाटा सुमारे 4.02 टक्के आहे. त्याच वेळी, त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 95,40,575 टायटनचे शेअर्स किंवा 1.07% हिस्सा आहे. पती-पत्नीचा मिळून 5.09 टक्के वाटा आहे. शेअर्सच्या किमतीतील उडी लक्षात घेऊन (118.70×452,50,970) मोजले तर ते रु. 537 कोटी होईल.

त्याचवेळी बिग बुलकडे स्टार हेल्थ कंपनीचे 10,07,53,935 शेअर्स आहेत. 17 मार्च रोजी एका शेअरच्या किमतीत झालेली उडी पाहिल्यास अंदाजे 324 कोटी रुपयांची वाढ मालमत्तेत दिसून आली. म्हणजेच दोन्ही कंपन्यांमुळे झुनझुनवाला यांच्या संपत्तीत 861 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup