Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

भारताचे वॉरेन बफे असणारे राकेश झुनझुनवाला झाले 61 वर्षांचे; पाच हजारांत सुरु केले होते शेअर मार्केटिंग, जाणून घ्या त्यांचा ‘बिअर’ ते ‘बिग बुल’ पर्यंतचा प्रवास

0 7

MHLive24 टीम, 05 जुलै 2021 :-  ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आज आपला 5 जुलै रोजी 55 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. भारताचा वॉरेन बफे म्हणून ओळखल्या जाणार्‍या झुनझुनवाला यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात कर अधिकाऱ्याच्या इथे झाला. 1985 मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच शेअर बाजारात ट्रेडिंग सुरू केली.

त्यावेळी बीएसई सेन्सेक्स जवळपास दीडशे अंकांवर होता आणि त्यावेळी त्यांनी फक्त 5 हजार रुपयांच्या भांडवलासह शेअर बाजाराचा व्यापार सुरू केला. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार 3 जुलै 2021 पर्यंत राकेश झुंझुनवालाची मालमत्ता 460 करोड़ डॉलर (34,387 करोड़ रुपये) झाली आहे.

Advertisement

राकेश झुनझुनवाला यांना टाटा टी चा पासून सर्वात मोठा नफा मिळाला आणि 1986 मध्ये त्यांना 5 लाख रुपयांचा नफा मिळाला. त्यांनी या कंपनीचे 5 हजार शेअर्स 43 रुपयांमध्ये खरेदी केले होते, ज्याने अवघ्या तीन महिन्यांत तीन पट अधिक उत्पन्न दिले. फक्त तीन महिन्यांत त्याची शेअर किंमत 143 रुपयांवर पोचली.

कधी काळी मार्केटमध्ये ‘बिअर’ होते राकेश झुनझुनवाला :- हर्षद मेहता यांच्या काळात राकेश झुनझुनवाला स्टॉक मार्केटमध्ये एकेकाळी मार्केटचे बिअर होते. 1992 मध्ये हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आला तेव्हा स्टॉक मार्केट च्या माध्यमातून मोठा नफा कमावला. झुनझुनवाला यांनी एका व्हिडिओ मुलाखतीत शॉर्ट सेलिंगद्वारे खूप पैसे कमावल्याचा खुलासा केला होता.

Advertisement

1990 च्या दशकात भारतीय शेअर बाजारात अनेक नामांकित कार्टेल होते. अशीच एक कार्टेक मनु मानेक ची होती जी बियर कार्टेल होती. मनु मानेक यांच्या कार्टेलला ब्लॅक कोब्रा म्हटले जात होते आणि त्यानंतर राधाकिशन दमानी आणि राकेश झुंझुनवाला त्यांना फॉलो करत होते. पत्रकार सुचेता दलाल यांनी हर्षद मेहता यांचे घोटाळे उघडकीस आणल्यानंतर शेअर बाजार क्रॅश झाला.

37 स्टॉक्स मध्ये 20 हजार कोटी रुपयांची होल्डिंग :- 1987 मध्ये राकेश राधेश्याम झुनझुनवाला यांनी अंधेरीच्या रेखा झुनझुनवालाशी लग्न केले जे स्टॉक मार्केट गुंतवणूकदार आहेत. 2003 मध्ये राकेश झुंझुनवाला यांनी स्वतःची शेअर ट्रेड फर्म रेअर एंटरप्राइजेस सुरू केली. हे नाव राकेशच्या आरए आणि रेखाच्या आरई पासून घेण्यात आले. 31 मार्च 2021 पर्यंत राकेश झुनझुनवाला अँड असोसिएट्सचे 37 स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्यात

Advertisement

टायटन कंपनी, टाटा मोटर्स, क्रिसिल, ल्युपिन, फोर्टिस हेल्थकेअर, नाझारा टेक्नॉलॉजीज, फेडरल बँक, डेल्टा कॉर्पोरेशन, डीबी रियल्टी आणि टाटा कम्युनिकेशन्स आदींचा समावेष आहे.

ट्रेंडलाईननुसार या 37 शेअर्समध्ये 19,695.3 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. झुंझुनवालाची सर्वाधिक गुंतवणूक टायटन कंपनीत असून, त्यांची मालमत्ता 7879 कोटी रुपये आहे, त्यानंतर टाटा मोटर्सची 1474.4 कोटी रुपये आणि क्रिसिलची 1063.2 कोटी रुपये हिस्सेदारी आहे.

Advertisement

बँकिंग सेक्टरमध्ये बुलिश आहे बिग बुल :- राकेश झुंझुनवाला बँकिंग क्षेत्राच्या बाबतीत अधिक बुलिश आहेत. जरी ते इनएफिशिएंट बँकांवर आशावादी आहे. नुकत्याच झालेल्या टीव्ही मुलाखतीत झुनझुनवाला म्हणाले होते की इनएफिशिएंट बँकांचे कॉस्ट-इनकम रेशियो खूप जास्त आहे जे कमी होईल.

त्याखेरीज यावर्षी देशातील नाममात्र जीडीपी 14-15 टक्के दराने वाढेल आणि येणाऱ्या काही वर्षांत 10 ते 12 टक्के दराने वाढेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही वर्षांत, बिग बुल्स देशातील स्ट्रक्चरल बदलांसंदर्भात तेजीची भूमिका घेत आहेत.

Advertisement

झुनझुनवाला यांचा असा विश्वास आहे की अशी कोणतीही लाट येणार नाही, ज्याचा भारतीय शेअर बाजारावर कोणताही परिणाम होणार नाही. बिग बुलच्या म्हणण्यानुसार, लाट येऊ अगर न येवो भारतीय अर्थव्यवस्था कोणत्याही प्रकारच्या संकटाला तोंड देण्यासाठी तयार आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement