राज कुंद्राच्या खात्यात येत होते, दररोज लाखो रुपये!

MHLive24 टीम, 22 जुलै 2021 :- अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणात अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याच्या खात्यात दररोज लाखो रुपये जमा होत होते. त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत.

अश्लील चित्रपट अपलोड करून कमावत होता बक्कळ पैसे :- राज कुंद्रा याची 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आता राज कुंद्रा याच्याबाबत अनेक धक्कादायक गाैप्यस्फोट होत आहेत. त्यातीलच एक म्हणजे त्यांच्या खात्यात रोज होणारं लाखो रुपयांचं डिपॉझिट!

Advertisement

राज कुंद्रा याचे काही बँक डिटेल्स हाती लागले आहेत. त्यात हाॅटशाॅट डीजिटल प्लॅटफॉर्मवर अश्लील चित्रपट टाकून राज कुंद्रा याच्या खात्यात रोज किती रुपये जमा होत होते, याची हैराण करून सोडणारी आकडेवारी समोर आली आहे.

दिवसाची कमाई एक ते दहा लाख रुपये ! :- हाती लागलेल्या बँक डिटेल्सनुसार राज कुंद्रा आणि त्याची कंपनी दिवसाला एक ते दहा लाख रुपये कमवत होते. त्यांच्या बँक अकाऊंटवर रोज लाखो रुपये जमा होत असल्याचं बँक डिटेल्सवरुन उजेडात आलं आहे. ही रोजचे आकडे लाखो रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे या उद्योगातून राज कुंद्रा किती रुपयांची कमाई करत होता, याचा अंदाज बांधणही कठीण आहे.

Advertisement

..तर राज कुंद्राला 3 वर्षाचा तुरुंगवास ! :- राज कुंद्रा याच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या हाती भक्कम पुरावे आहेत. त्याच्याविरोधात अनेक आयपीसी कलमांसोबतच आयटी अॅक्ट कलम 67, 67A लावले गेले आहेत. त्यातील 67 अ हे पोर्नोग्राफी संदर्भात आहे. तो अजामीनपात्र गुन्हा आहे. त्यात पहिल्यांना गुन्हा केला असेल तर तीन वर्षांची शिक्षा आणि पाच लाख रुपये दंड आकारला जातो.

एकाच व्यक्तीने दुसऱ्या वेळीही तोच गुन्हा केल्यानंतर तर त्याला पाच वर्षांची शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड आहे, तर तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास सात वर्षाची शिक्षा आणि दहा लाख रुपये दंडाची तरदूत असल्याची माहिती कायदे विशेषज्ञ आणि सायबर एक्सपर्ट प्रशांत माळी यांनी दिली.

Advertisement

राज कुंद्राचा ‘प्लॅन-बी’ :- अश्लील चित्रपट प्रकरणात एक नवीन गाैप्यस्फोट झाला आहे. हॉटशॉट अॅप निलंबित झाल्यानंतर राज कुंद्राने प्लॅन बी बनवला होता. प्रदीप बक्षी याच्याशी व्हॉट्सअॅप चॅटमध्ये गुगल प्लेने आपल्या स्टोअरमधून राज कुंद्राचे हॉटशॉट अॅप काढून टाकल्यानंतरदेखील राज कुंद्रा नवीन योजना आखत असल्याचे समोर आले आहे. राज कुंद्राने सगळा बोल्ड कंटेंट काढून प्ले स्टोअरवर पुन्हा हॉटशॉट सुरू करण्याची तयारी केली होती. गुगल प्लेने संपर्क साधलेल्या मेलचा तपशीलही या चॅटमध्ये आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement