Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

राज ठाकरे यांचे ‘मी पुन्हा येईन’

0 178

MHLive24 टीम, 22 जुलै 2021 :- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवस पुण्यात ठाण मांडून होते. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी त्यांनी संघटनात्मक बांधणी केली. निवडणुकीत ४५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठरविले असल्याने त्यांनी तीस तारखेला पुन्हा पुण्यात येण्याचे जाहीर केले. 

पुणे सोडताना पुढची तारीख जाहीर

Advertisement

राज ठाकरे यांनी पुण्यातून मुंबईला जाताना पुढचा पुणे दौराही जाहीर केला आहे. आठ दिवसांनी म्हणजे 30 जुलैला राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली.

पुन्हा तीन दिवसांचा दौरा

Advertisement

सध्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यानंतर राज ठाकरे 30 जुलैपासून पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. 30 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान राज ठाकरे यांचा पुणे दौरा असणार आहे. ठाकरे यांनी यादरम्यान पुण्यातील विकास कामाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांना घरी येण्याचे निमंत्रणही दिले आहे.

मनसे शहरात राजदूतांची नेमणूकही करणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.

Advertisement

शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफर

दरम्यान, पुणे महापालिकेत मनसेची चांगली कामगिरी व्हावी, म्हणून राज ठाकरे यांनी पक्षाच्या शाखाध्यक्षांसाठी भन्नाट ऑफरही दिली. चांगलं काम करणाऱ्या शाखाध्यक्षांच्या घरी मी जेवायला येईल, असं राज यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये उभारी भरण्यासाठी राज यांनी ही ऑफर दिली आहे. सध्या पुण्यता मनसे कार्यकर्त्यांमध्ये या ऑफरची जोरदार चर्चा सुरू आहे.

Advertisement

45 जागा निवडून येणारच, मनसेचा दावा

प्रभाररचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असे मनसे नेते सांगतात; मात्र शहरातील पक्ष संघटनेचा प्रभावही कमी झाला होता. आगामी 2022 च्या महापालिका निवडणुकीत मनसे सर्व जागा लढवणार आहे. त्यातील 90 जागांवर मनसेने लक्ष केंद्रीत केल्याचे सांगतानाच 45 जागा निवडून येणारच असा दावा मनसेचे नेते करत आहेत.

Advertisement

पुणे महापालिकेतील पक्षीय बलाबल

  • भाजप  99
  • राष्ट्रवादी  42
  • काँग्रेस  10
  • शिवसेना  10
  • मनसे  2
  • एमआयएम  1
  • एकूण जागा  164
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement