Inflation Increase: महागाईचा झटका ! लोकप्रिय पार्ले-जी बिस्किटांसह ‘ही’ प्रोडक्ट महागली, जाणून घ्या नवीन किंमती

MHLive24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- सध्या महागाईचा सामना सर्वच लोक करत आहेत. महागाईची झळ ग्राहकांप्रमाणेच व्यावसायिकांनाहि बसली आहे. आता महागाईच्या पार्श्वभूमीवर पार्लेने एक मोठा निर्णय घेतला आहे. पार्ले ने आपल्या सर्व उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत आहे.(Inflation Increase)

त्यामुळे आता कंपनीने तिच्या सर्व कॅटेगिरीतील प्रॉडक्टच्या किमती 5-10 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. साखर, गहू आणि खाद्यतेलासारख्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे कंपनीला आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवाव्या लागल्याची माहिती कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिली.

किमती 10 टक्क्यांपर्यंत वाढल्या!

Advertisement

पार्ले कंपनीचे सर्वाधिक लोकप्रिय बिस्किट पार्ले-जी 6 ते 7 टक्क्यांनी महागले आहे. याशिवाय, कंपनीने रस्क आणि केक सेगमेंटमध्येही 5-10 टक्के आणि 7-8 टक्क्यांनी वाढ केली आहे. Hide and Seek आणि Crackjack सारखी लोकप्रिय बिस्किटे पार्ले G कंपनीची आहेत.

किंमत बदलणार नाही, वजन घटेल

पार्ले प्रॉडक्ट्सचे वरिष्ठ श्रेणी प्रमुख मयंक शाह म्हणाले, “आम्ही किमती 5-10 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. कंपनीने 20 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीची बिस्किटे आणि इतर उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. त्याच वेळी, किमती आकर्षक पातळीवर ठेवण्यासाठी, पॅकेटच्या ‘ग्राम’मध्ये कपात करण्यात आली आहे.

Advertisement

कंपनीने किमती का वाढवल्या ?

पार्लेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही उत्पादन खर्चावर होत असलेल्या सततच्या महागाईचा दबाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. खाद्यतेलासारख्या निविष्ठ सामग्रीच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत 50-60 टक्क्यांनी वाढल्याने बहुतांश कंपन्यांना महागाईच्या दबावाचा सामना करावा लागत आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की या आर्थिक वर्षात (2021-2022) पार्लेने प्रथमच ही वाढ केली आहे. यापूर्वी, कंपनीने जानेवारी-मार्च 2021 च्या तिमाहीत किमती वाढवल्या होत्या, परंतु ते 2020-2021 या आर्थिक वर्षात करण्यात आले होते.

Advertisement

पार्लेची ब्रेकफास्ट सिरीअल

पार्ले या देशातील सर्वात आवडते बिस्किट निर्माता कंपनीने नुकतेच बाजारात ब्रेकफास्ट सिरीअल आणण्याची घोषणा केली आहे. पार्ले आपल्या सुप्रसिद्ध ब्रँड Hyde & Seek या नावाने ब्रेकफास्ट उत्पादन बाजारात आणणार आहे.

कंपनीला आशा आहे की ज्या प्रकारे बिस्किटे, स्नॅक्स आणि कन्फेक्शनरीला लोकांचा पाठिंबा मिळाला आहे, त्याप्रमाणे नाश्त्याचे पदार्थही लोकप्रिय होतील.

Advertisement

पारले चे वरिष्ठ श्रेणीचे मार्केटिंग प्रमुख बी कृष्ण राव म्हणाले, “इनपुटच्या किमती वाढल्या आहेत. यामुळे किंमत वाढत आहे आणि आर्थिक वर्षात त्यांची किंमत 15 टक्क्यांपेक्षा जास्त वाढू नये अशी आमची इच्छा आहे.’

या कंपन्यांनीही किमती वाढवल्या

पार्ले व्यतिरिक्त मॅरिको, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि नेस्ले इंडिया या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांचे दर आधीच वाढवले आहेत. मेरिको सफोला, पॅराशूट, सेट वेट आणि लिव्हॉन सारखी उत्पादने बनवते. या कंपनीने सफोलाचे दर 50 टक्क्यांनी वाढवले आहेत.

Advertisement

त्याचप्रमाणे हिंदुस्तान युनिलिव्हर डोव्ह, लक्स, पेअर्स, हमाम, लिरिल, सर्फ एक्सेल, व्हील यांसारखी नामांकित उत्पादने तयार करते. या कंपनीने सर्फ एक्सेल, रिन, लक्स, व्हील डिटर्जंटच्या किमतीत 2.5 टक्क्यांनी वाढ केली आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker