Mhlive24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:– भारतीय कंपनी टाटा मोटर्सने नव्वदीच्या दशकातील त्यांची आयकॉनिक एसयुव्ही टाटा सफारीचे नवीन मॉडेल लाँच केले आहे. ही एसयुव्ही कंपनीने प्रजासत्ताक दिनादिवशी दाखविली केली होती. 2.0 डिज़ाइन लँग्वेजवर तयार करण्यात आली आहे. ही कार कंपनीने 14.69 लाख रुपयांना एक्स शोरुम किंमत लाँच केली आहे..
टाटाने नवीर सफारी ओमेगा आर्क प्लॅटफॉर्मवर बनविली आहे. याच प्लॅटफॉर्मवर लक्झरिअस एसयुव्ही Land Rover बनविली जाते. महत्वाचे म्हणजे टाटाची हॅरिअरदेखील OMEGARC डिझाईनवरच बनविण्यात आले आहे. हा लँडरोव्हरचा D8 प्लेटफॉर्म आहे.
टाटा मोटर्सचे डिझेल इंजिन खूप ताकदवान मानले जातात. या SUV मध्ये कंपनीने 2.0 लीटर क्षमतेचे Kryotec टर्बो डिझेल इंजिन दिले आहे. जे 170hp आणि 350 एनएम चा पीक टॉर्क तयार करते.
2021 टाटा सफारी एसयूव्ही ही कार मुळात टाटाच्याच हॅरियरचं मोठं व्हर्जन आहे. कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की, सफारी एकूण सहा व्हेरियंट्समध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये XE, XM, XT, XT+, XZ आणि XZ+ या व्हेरियंट्सचा समावेश आहे.
6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6 स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्स ने हे इंजिन लेस आहे. सफारीला XE, XM, XT, XT +, XZ आणि XZ + मध्ये आणण्यात आले आहे. ऑटोमॅटीक ट्रान्समिशनसोबत कार 14.8 kmpl मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे.
ही नवीन कार 6 आणि 7 सीटर ऑप्शनमध्ये मिळणार आहे. तसेच या कारमध्ये या सेगमेंटमधील सर्वात मोठी सनरुफ पहायला मिळणार आहे.
नवीन टाटा सफारी 3 रो वर्जनसह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये 6-7 जण आरामात बसू शकतात. कंपनीने या एसयूव्हीमध्ये अनेक प्रिमियम फिचर्स दिले आहेत.
या कारमध्ये 7 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम एक्सएम ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तर ऑटो-सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलँप, टीपीएमएस, आयआरए कनेक्टेड कार अॅपसारखे फीचर्स एक्सटी ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिले जाणार आहेत
या करची किंमत 16 ते 24 लाख रुपये असू शकते. दरम्यान कंपनीने या कारमध्ये असे काही फिचर्स दिले आहेत, ज्यामुळे ही कार या वर्षातली सर्वात बेस्ट एसयूव्ही ठरू शकते.
टाटा सफारीच्या प्रत्येक वेरियंटमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प्स दिले जातील. यासोबत तुम्हाला LED डेटाईम रनिंग लॅम्प्सही दिले जातील, जे इंडिकेटर्सदरम्यान डबल होतील.
हॅरियरमध्ये केवळ फ्रंट (पुढच्या बाजूचे) टायर्समध्ये डिस्क ब्रेक्स देण्यात आले होते. परंतु टाटा सफारीच्या प्रत्येक टायरमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक्स मिळतील. विशेष म्हणजे सफारीच्या प्रत्येक वेरियंटमध्ये ही सुविधा दिली जाईल.
2021 टाटा सफारीमध्ये स्लायलिश रूफ रेल्स देण्यात आले आहेत, जे या गाडीला अधिक प्रिमियल लुक देतात. रुफ रेल्सवर सफारीचं ब्रँडिंग करण्यात आलं आहे.बॉस मोड एक असं बटण आहे ज्याद्वारे मागे बसलेला प्रवासी पुढे बसलेल्या प्रवाशाची सीट पुढे ढकलू शकतो. यामुळे मागे बसलेल्या प्रवाशाला स्वतःच्या सोयीने आरामात बसता येतं.
2021 टाटा सफारीमध्ये टिल्ट आणि टेलीस्कोप अॅडज्सटेबल स्टियरिंग व्हील देण्यात आलं आहे, जे प्रत्येक वेरियंटमध्ये मिळेल. यामुळे रायडरला (चालकाला) परफेक्ट रायडिंग पोझिशन मिळते.सफारीमध्ये रिक्लायनिंग सेकेंड रो सीट्स मिळतात ज्या रियर पॅसेंजर्ससाठी खूपच आरामदायक आहेत. लांबच्या प्रवासासाठी जात अताना हे फिचर प्रवाशांसाठी खूप महत्त्वाचं आहे.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर