Post office’s good scheme : पोस्टाची लय भारी स्कीम; 47 रुपये भरून बना 35 लाखांचे मालक

MHLive24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- भविष्य लक्षात ठेवून गुंतवणूक करणे महत्वाचे आहे, परंतु अनेक लोक गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमुळे गोंधळून जातात. बर्‍याच योजना अशा आहेत कि ज्या जास्त रिटर्न देण्याचे वचन देतात परंतु त्यात रिस्क मोठी असते. यामुळे लोक कमी रिटर्न मिळाला तरी चालेल पण सरकारी स्कीम पाहत असतात.(Post office’s good scheme)

अशीच एक योजना आहे ग्राम सुरक्षा योजना जी इंडिया पोस्ट द्वारे दिली जाते. ज्यांना सेवानिवृत्तीसाठी बचत करण्याचे प्लॅनिंग आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली विमा योजना असू शकते. ग्राम सुरक्षा योजना बोनससह रकमेची हमी देते जी 80 वर्षांचे झाल्यावर किंवा मृत्यू झाल्यास (जे आधी असेल) त्यांच्या कायदेशीर वारस/नामनिर्देशित व्यक्तीला मिळते.

नामनिर्देशित व्यक्तीला मॅच्युरिटीवर लाभ मिळणार

Advertisement

या पॉलिसीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विमाधारकाच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्तीला मॅच्युरिटीवर लाभ मिळतो किंवा विमाधारकाची 80 वर्षे पूर्ण झाल्यावर त्याला मॅच्युरिटी लाभ मिळतो. या पॉलिसी अंतर्गत मॅच्युरिटी वयोमर्यादा 50, 55, 58 आणि 60 वर्षे असू शकते.

मासिक प्रीमियम किती असेल?

RPLI योजनेंतर्गत प्रीमियमच्या रकमेबद्दल बोलायचे झाल्यास जर कोणी 19 वर्षांच्या वयात 5 लाखांची विमा रक्कम विकत घेतली आणि त्याचे मॅच्युरिटी वय 60 वर्षे असेल तर प्रत्येक महिन्यासाठी प्रीमियमची रक्कम 705 रुपये असेल. 58 वर्षांच्या मॅच्युरिटीवर प्रीमियम 732 रुपये, 55 वर्षांच्या मॅच्युरिटीवर प्रीमियम 758 रुपये आणि 50 वर्षांच्या मॅच्युरिटीवर प्रीमियम 810 रुपये असेल.

Advertisement

मुदतपूर्तीनंतर 17.30 लाख उपलब्ध होतील

60 वर्षांच्या मॅच्युरिटीसाठी रक्कम 17.30 लाख, 58 वर्षांसाठी 16.70 लाख, 55 वर्षांसाठी 15.80 लाख आणि 50 वर्षांसाठी 14.30 लाख रुपये असेल. बोनसची गणना करणे अगदी सोपे आहे. हे प्रति वर्ष 60 रुपये प्रति विमा रक्कम आहे.

त्यानुसार एक लाखाच्या विमा रकमेवरील बोनस 6000 रुपये झाला. 5 लाखांच्या विमा रकमेवर वार्षिक बोनस 30 हजार रुपये झाला. जर 18 वर्षांच्या मुलाने 60 वर्षांची योजना निवडली तर 41 वर्षांमध्ये एकूण बोनस 12.30 लाख रुपये आहे. या 41 वर्षांत तो प्रीमियम म्हणून 3.46 लाख रुपये जमा करेल.

Advertisement

प्रीमियम

19 वर्षांच्या वयात 10 लाख विमा रकमेची ग्राम सुरक्षा पॉलिसी खरेदी केल्यावर 55 वर्षांसाठी मासिक प्रीमियम 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. 55 वर्षांसाठी परिपक्वता लाभ 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी परिपक्वता लाभ 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी परिपक्वता लाभ 34.60 लाख रुपये असेल.

ग्राम सुरक्षा पॉलिसीत नामांकित सुविधा देखील प्रदान केलीय. जर एखाद्या ग्राहकाला ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा लागेल. जर तुम्हाला टपाल विम्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही 1800 180 5232/155232 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता. याशिवाय http://www.postallifeinsurance.gov.in/ या वेबसाईटवरही विशिष्ट माहितीसाठी भेट दिली जाऊ शकते.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker