Post Office Schemes : पोस्ट ऑफिस देत आहे तुम्हाला करोडपती होण्याची संधी! ‘ह्या’ योजनेत गुंतवा फक्त 417 रुपये

MHLive24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- पोस्ट ऑफिस सध्या गुंतवणुकीच्या अनेक योजना चालवते. पोस्टाची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पब्‍ल‍िक प्रोविडेंट फंड योजना देखील प्रचंड लोकप्रिय आहे. ही स्कीम तुम्हाला करोडपती बनण्याची संधी देते.(Post Office Schemes)

तुम्हाला या खात्यात दररोज फक्त 417 रुपये गुंतवावे लागतील. या खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा असला, तरी तुम्ही तो 5-5 वर्षांसाठी दोनदा वाढवू शकता. यासोबतच या प्लॅनमध्ये तुम्हाला कर लाभही मिळतो.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्हाला वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळते आणि तुम्हाला दरवर्षी चक्रवाढ व्याजाचा लाभही मिळतो. ही योजना तुम्हाला करोडपती कशी बनवू शकते हे जाणून घेऊयात.

Advertisement

पोस्ट ऑफिस पीपीएफ खात्याचे तपशील जाणून घ्या

जर तुम्ही 15 वर्षे म्हणजे मॅच्युरिटी होईपर्यंत गुंतवणूक केली आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये वार्षिक जमा केले, म्हणजे 12500 रुपये प्रति महिना किंवा 417रुपये रोज तर तुमची एकूण गुंतवणूक 22.50 लाख रुपये होईल.

म्हणजेच, तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी 7.1 टक्के वार्षिक व्याजासह चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळेल. मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला 18.18 लाख रुपये व्याज मिळतील. म्हणजेच तुम्हाला 40.68 लाख रुपये मिळतील.

Advertisement

तुम्ही करोडपती कसे व्हाल?

जर तुम्हाला या योजनेतून करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला ही योजना 15 वर्षांनंतर 5-5 वर्षांसाठी दोनदा वाढवावी लागेल. वार्षिक 1.5 लाख रुपये गुंतवल्यास, तुमची एकूण गुंतवणूक 37.50 लाख रुपये होईल.

मॅच्युरिटीनंतर तुम्हाला 7.1 टक्के व्याजदरासह 65.58 लाख रुपये मिळतील. म्हणजेच 25 वर्षांनंतर तुमचा एकूण फंड 1.03 कोटी रुपये होईल.

Advertisement

PPF खाते कोण उघडू शकते ?

पगारदार, स्वयंरोजगार, पेन्शनधारक इत्यादींसह कोणताही रहिवासी पोस्ट ऑफिसच्या पीपीएफमध्ये खाते उघडू शकतो.
फक्त एक व्यक्ती हे खाते उघडू शकते. यामध्ये तुम्ही संयुक्त खाते उघडू शकत नाही.
अल्पवयीन मुलाच्या वतीने पालक पोस्ट ऑफिसमध्ये PPF खाते उघडू शकतात.
अनिवासी भारतीयांना त्यात खाते उघडता येत नाही. जर रहिवासी भारतीय PPF खात्याच्या मॅच्युरिटीपूर्वी एनआरआय झाला तर तो मॅच्युरिटी होईपर्यंत खाते चालू ठेवू शकतो.

पोस्ट ऑफिस पीपीएफ खात्यासाठी आवश्यक कागदपत्रे

Advertisement

ओळखीचा पुरावा – मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड
पत्ता पुरावा- मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड
पॅन कार्ड
पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
नावनोंदणी फॉर्म- फॉर्म ई

पोस्ट ऑफिस पीपीएफ खात्याची वैशिष्ट्ये

1. एका आर्थिक वर्षात PPF खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये ठेवण्याची परवानगी आहे.
2. पोस्ट ऑफिस PPF मध्ये ठेवींची संख्या वार्षिक 12 पर्यंत मर्यादित आहे.
3. PPF मध्ये गुंतवलेली मूळ रक्कम, मिळालेले व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम या सर्व करमुक्त आहेत.
4. खाते सक्रिय ठेवण्यासाठी किमान वार्षिक गुंतवणूक 500 रुपये आहे.
5. पोस्ट ऑफिस PPF खात्यावर 31 मार्च रोजी चक्रवाढ व्याज दरवर्षी दिले जाते.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker