PF money cannot be withdrawn : ‘ह्या’ चार चुका केल्या असतील तर काढता येणार नाहीत PF चे पैसे

MHLive24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- तुम्ही देखील EPFO सदस्य असाल तर ही बातमी तुमच्यासाठी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ईपीएओच्या नियमांद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही केलेल्या विड्रॉल क्लेममध्ये किंवा पैसे काढताना समस्या येऊ शकतात.(PF money cannot be withdrawn)

नोकरदार व्यक्तींच्या पगारातील ठराविक रक्कम दर महिन्याला भविष्य निर्वाह निधीत जमा होत असते. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या उतारवयासाठीची पुंजी मानली जाते.

सध्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर EPFO नोकरदारांना अडचणीच्या काळात वापरण्यासाठी पीएफची काही रक्कम आगाऊ काढण्याची सुविधा देऊ केली आहे. मात्र, अडचणीच्यावेळी घाईघाईत PF चे पैसे काढताना काही चुका झाल्यास त्या निस्तरणे अवघड होऊन बसते.

Advertisement

त्यामुळे भविष्य निर्वाह निधीतील आपली गुंतवणूक आपल्या गरजेच्या वेळी लगेच मिळावी यासाठी काही बाबतीत काळजी घेणं महत्त्वाचं आहे. या बाबी अपूर्ण असतील तर आपल्या पीएफचे पैसे मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

बँक खात्याचा चुकीचा तपशील 

तुम्ही तुमच्या बँक खात्याची माहिती देताना काही चुकीची माहिती दिली असल्यास तुमचा अर्ज नाकारला जाईल. ईपीएओमध्ये तुम्ही ज्या बँक खात्याची माहिती देता त्याच खात्यात पैसे येतात. त्यात चूक झाली असेल किंवा अर्जात नमूद केलेलं बँक खातं आणि नोंदणीकृत बँक खातं यात फरक असेल, तर पैसे मिळण्यात अडचण येते. तुम्ही नोंदणी केलेलं बँक खातं तुमच्या यूएएनशी लिंक केलं जावं.

Advertisement

UAN आणि बँक खाते योग्य आहे का तपासा

तुमचे भविष्य निर्वाह निधी खात्याचा (PF Account) UAN नंबर आणि बँक खाते लिंक केलेले आहे की नाही, हे तपासावे. नंबर आणि बँक खाते लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळवण्यात अडचणी येतील. याशिवाय, EPFO च्या रेकॉर्डसमध्ये बँकेचा योग्य IFSC Code नमूद केलेला असावा.

केवायसी

Advertisement

अनेकदा पीएफ खातेधारकाने केवायसीची पूर्तता केलेली नसते. त्यामुळे तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. याशिवाय, तुमचा केवायसी तपशील योग्य असणे गरजेचे आहे. तुम्ही EPFO च्या संकेतस्थळावर जाऊन या गोष्टी योग्य आहेत किंवा नाही, हे तपासू शकता.

अटी पूर्ण न झाल्यास 

आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही पैसे काढत असाल तर तीन अटी पूर्ण करणं सर्वात महत्त्वाचं आहे. या तीन अटी पूर्ण न केल्यास तुमचा अर्ज रद्द होईल. पहिली अट म्हणजे तुमचा यूएएन सक्रिय असणं आवश्यक आहे.

Advertisement

दुसरी अट तुमचं अकाउंट आधार व्हेरीफाईड आणि युएएनशी जोडलेलं असणं आवश्यक आहे आणि तिसरी अट म्हणजे योग्य आयएफएससीसह बँक अकाउंट यूएएनशी जोडलेलं असावं. या व्यतिरिक्त, सदस्याची स्वाक्षरी स्पष्ट असावी आणि ती रेकॉर्डशी जुळली पाहिजे, अन्यथा दावा फेटाळला जाईल.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker