Mhlive24.com
Maharashtra Live News Updates In Marathi

अबब! पेट्रोल @104; आजही वाढले ‘इतके’ भाव

0 10

MHLive24 टीम, 27 जून 2021 :- आजही डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढविण्यात आले आहेत. दिल्लीत पेट्रोल दर आज प्रतिलिटर 35 पैशांनी वाढून 98.46 रुपये प्रति लिटर झाला आहे. त्याचबरोबर डिझेलचा दर 25 पैसे प्रति लिटरने वाढून 88.90 रुपये प्रति लिटर झाला आहे.

सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेतल्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम दैनिक अधारावर 6 नंतर पेट्रोल दर आणि डिझेल दर सुधारित करतात आणि जारी करतात.

Advertisement

महानगरांमधील आजचे नवीनतम दर जाणून घ्या

  • आता दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 98.46 रुपये आहे. त्याचबरोबर 1 लिटर डिझेल प्रति लिटर 88.90 रुपये आहे.
  • कोलकातामध्ये आता 1 लिटर पेट्रोलची किंमत 98.30 रुपये आहे. त्याचबरोबर 1 लिटर डिझेल प्रति लिटर 91.75 रुपये आहे.
  • आता मुंबईत 1 लिटर पेट्रोलची किंमत 104.56 रुपये आहे. त्याचबरोबर 1 लिटर डिझेल प्रति लिटर 96.42 रुपये आहे.
  • आता चेन्नईत 1 लिटर पेट्रोलची किंमत 99.49 रुपये आहे. त्याचबरोबर 1 लिटर डिझेल प्रति लिटर 93.46 रुपये आहे.

असे ठरवतात किंमत :- परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. याच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात.

Advertisement

पेट्रोलमध्ये किती आहे टॅक्स ? :- आपण पेट्रोल आणि डिझेलसाठी जी किहीम मोजता त्यापैकी पेट्रोलसाठी 55.5 टक्के आणि डिझेलसाठी 47.3 टक्के टॅक्स भरत आहात.

पेट्रोल पंप डीलरचे कमीशन महाग करते इंधन :- डीलर्स म्हणजे पेट्रोल पंप चालवतात ते लोक. ते कर आणि त्यांचे स्वतःचे मार्जिन जोडल्यानंतर ग्राहकांना त्या दराने पेट्रोल स्वत: विकतात. पेट्रोल दर आणि डिझेल दरामध्येही ही किंमत जोडली जाते.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit